शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरानं पेट्रोलपंप चालकाला शिकवला चांगलाच धडा; भरायला लावला '६० हजार दंड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:23 IST

पेट्रोल पंपावर हवा भरण्याची सोय नाही, टॉयलेटही अस्वच्छ, पिण्याचं पाणी नाही

अश्विनी जाधव केदारी 

पुणे: पुण्यातील एका पेट्रोल पंपावर पाणी हवा आणि स्वच्छतागृह यासारख्या सुविधा नसल्याने एका जागरूक पुणेकराने याबाबत तक्रार केली आणि त्या पेट्रोल पंप चालकाला दंड आकारला गेला आहे.  

 पेट्रोल पंपावर पाणी गाडीच्या चाकात भरण्यासाठी हवा, आणि स्वच्छतागृह या मूलभूत गोष्टी ग्राहकांना मिळायलाच हव्या असा नियम आहे. मात्र बऱ्याचदा अनेक पेट्रोल पंपावर या गोष्टी पाहायला मिळत नाहीत.  आणि पेट्रोल पंप चालक त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात,  पण असं दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याचे एक उदाहरण पुण्यात पाहायला मिळाले, पुण्यातील एका पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याने आणि हवा भरण्याची सोय नसल्याने एका जागरूक पुणेकर नागरिकांना याची तक्रार केली. प्रफुल्ल सारडा असे या तरुणाचे नाव आहे. पेट्रोल पंपावर वर चांगलं स्वच्छ टॉयलेट, मोफत हवा असणं. मात्र अनेक पेट्रोल पंपावर ते दिसत नाहीत. आणि तसं नाही दिसलं त्याच्या विरोधात सारडा याने चक्क तक्रार केली. 

सारडा म्हणाला, कोंढवा रोडवर ईश्वर सर्व्हिस स्टेशन नावाचं बीपीएलचा पेट्रोल पंप आहे. त्याठिकाणी गेले काही महिने मी जात आहे. तिथं पिण्याचं पाणी नाही. टॉयलेट खूप अस्वच्छ होतं. ग्राहकांना हवा मोफत मिळायला पाहिजे. ती तिथे वर्षातनं सहा ते आठ महिने मिळत नाही. आणि त्यांनी ती जागा दुसऱ्या पंक्चरवाल्याला काही तरी भाड्याने दिलेली असते. आणि तो तिथून मग तुमचे पाच दहा रुपये घेतो. ज्यावेळी मी याची तक्रार केली. आणि बीपीएलच्या संबंधित अधिकाऱ्याला मी त्याला सांगितलं की, गेले अनेक महिने हा त्रास सुरू आहे. टॉयलेट अस्वच्छ असून त्याचा खूप वास येतो. आणि तिथे जेन्टस , लेडीज कोणीही जाऊ शकत नाही. अशा गोष्टी मी त्याच्या निदर्शनात आणून दिल्या. जवळपास दहा ते बारा दिवस त्याच्याशी फॉलो अप घेतल्यानंतर त्यांनी ऑडिट केलं. आणि त्या पेट्रोलपंपाला जो नितीन ईश्वरलाल चहा याच्या नावानी आहे. त्याला साठ हजार रुपयाचा दंड लावला. 

पेट्रोल पंपावर या मूलभूत गोष्टी असायलाच हव्या आणि त्या नसतील आणि तुम्ही जर त्याची तक्रार केली. तर निश्चितच पंप चालकांना दंड आकारला जाऊ शकतो. आणि त्यामुळे अशा प्रकारे जागरूक राहून जर प्रत्येक नागरिकानं वेळीच लक्ष दिलं तर या समस्या निश्चितच सुटायला मदत होईल. असेही त्याने यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPetrol Pumpपेट्रोल पंपWaterपाणीHealthआरोग्यMONEYपैसाPetrolपेट्रोलSocialसामाजिक