खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 21:07 IST2025-09-28T21:05:08+5:302025-09-28T21:07:47+5:30
ज्ञानेश्वर कोबल असे मृत व्यक्तीचे नाव, कारचा नंबर MH 14 EU 3441 हा आहे.

खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क, राजगुरूनगर: चास टोकेवाडी (ता. खेड) या परिसरात भिमानदी पात्रात एक कार बुडाली. कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर कोबल (रा. मोहकल ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी २८ सप्टेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडली. घटनास्थळी खेड पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले होते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने एम एच १४ ई यू ३४४१ ही कार पाण्याच्या बाहेर काढण्यात आली. कारमध्ये ज्ञानेश्वर कोबल यांचा मृतदेह मिळून आला. रस्त्याने येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असावी, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. चास कमान धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.