Rain Updates | मावळात दोन दिवसांत ९७० मिमी पडला पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 14:53 IST2022-07-14T14:50:27+5:302022-07-14T14:53:47+5:30
वडगाव मावळ ( पुणे ) : मावळ तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्यात वाढ झाली ...

Rain Updates | मावळात दोन दिवसांत ९७० मिमी पडला पाऊस
वडगाव मावळ (पुणे) :मावळ तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे.
तालुक्यात मंगळवारी वडगाव येथे १०१ मिलिमीटर, तळेगाव ९०, खडकाळा १११, कार्ला १९७, काले काॅलनी १३०, लोणावळा २२०, शिवने ११५, असा एकूण ९७० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.
बुधवारी वडगाव ५३, तळेगाव २३, खडकाळा ९०, कार्ला १७७, काले काॅलनी १४९, लोणावळा २१३, शिवने १३०, एकूण ८३५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. मंगळवारपर्यंत पावसामुळे तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित हानी झाली नसल्याचे महसूल विभागाने सांगितले.