पुणे रेल्वे विभागात १९ हजार फुकट्यांकडून १ कोटींचा दंड वसूल

By अजित घस्ते | Updated: September 4, 2023 18:15 IST2023-09-04T18:14:48+5:302023-09-04T18:15:03+5:30

तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल अन्यथा दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो

Pune railway department collects fine of 1 crore from 19 thousand free passers | पुणे रेल्वे विभागात १९ हजार फुकट्यांकडून १ कोटींचा दंड वसूल

पुणे रेल्वे विभागात १९ हजार फुकट्यांकडून १ कोटींचा दंड वसूल

पुणे: रेल्वेच्यापुणे विभागात ऑगस्ट महिन्यात १९ हजार फुकट्यांवर कारवाई करत १ कोटी ४३ लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अनियमित प्रवासासाछी ९ हजार १४९ जणांना ५१ लाख ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सामान बुक न करता परस्पर घेऊन जाणाऱ्या २३४ जणांकडून २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू राणी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांचे नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. तरी प्रवाशांना विनंती करण्यात येते की, त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल अन्यथा दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहन पुणे रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Pune railway department collects fine of 1 crore from 19 thousand free passers