शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 16:53 IST

Pune Accident : पुण्यातल्या पोर्श अपघात प्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धक्कादायक खुलास केला आहे.

Pune porsche accident :पुणे पोर्श अपघात प्रकरणाची गेल्या आठवडाभरापासून जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या रविवारी पुण्यात पहाटेच्या सुमारास विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत दोघांना धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी मुलाला १५ तासांतच जामीन मिळाला. तसेच विशाल अगरवाल यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर विशाल अगरवाल यांची पोलीस कोठडीत तर आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या सगळ्यात आरोपीच्या वडिलांनी  त्या दिवशी मुलगा नाहीतर ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे आरोपीच्या आजोबांनीही चालकाला डांबून ठेवत धमकावले होते. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्याप्राशन करून अल्पवयीन मुलाने आलिशान कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतरपोलिसांनी अल्पवयीन मुलाला दुपारी विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपी मुलाला जामीन मंजूर केला. त्यानंतर कोर्टाने आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली होती. दुसरीकडे विशाल अगरवाल यांनी त्या दिवशी मुलगा नाहीतर चालक गाडी चालवत होता असं म्हटलं होतं. मात्र आतापुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत मोठा उलघडा केला. आरोपी मुलाच्या कुटुंबाने चालकावर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाच्या कुटुंबाला मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी अपघाताची जबाबदारी घेण्यास भाग पाडले. कुटुंबाने ड्रायव्हर गंगाधरला मन वळवण्यासाठी धमक्या, पैसे आणि भेटवस्तू वापरल्याचा आरोप आहे. “आम्ही चालकाचे म्हणणे नोंदवले आहे. रविवारी (अपघातानंतर) पहाटे २:४५ च्या सुमारास बिल्डरने फोन केल्याचे त्याने सांगितले. अपघात झाला तेव्हा तो कारच्या स्टेअरिंगवर होता असं सांगण्याचा दबाव आरोपीच्या वडिलांनी चालकावर टाकला होता. बिल्डरच्या पत्नीनेही त्याला अपघाताची जबाबदारी घेण्याची भावनिक विनंती केली होती. कुटुंबातील सदस्यांनी त्याला असे करण्यासाठी विविध आमिषे दाखवली होती," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली.

"अपघातानंतर आरोपीचे मित्र आणि चालकाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. सुरुवातीला चालकाने आपणच गाडी चालवत होतो असं सांगितलं. पण, पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास बिल्डरने चालकाला सोडवले  आणि त्याचा मोबाइल स्वतःकडे ठेवला. त्यानंतर आरोपी मुलाच्या आजोबांनी चालकाला वडगावशेरी इथल्या बंगल्यात डांबून ठेवलं. आम्ही सांगू त्याप्रमाणे जबाब द्यायचा असा दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर चालकाचे कुटुंबिय अगरवाल यांच्यावर बंगल्यावर गेले आणि त्यांनी चालकाला सोडण्यास सांगितले. तिथून बाहेर पडल्यानंतर चालकाने पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या आजोबांविरुद्ध तक्रार दाखल केली आम्ही. त्यानुसार आम्ही सुरेंद्र अगरवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली," असेही अमितेश कुमार यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिस