Pune Porsche accident: अजित पवारांची सीपींसोबत चर्चा, कल्याणी नगर अपघाताप्रकरणी कडक कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 08:54 AM2024-05-22T08:54:22+5:302024-05-22T08:55:04+5:30

कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाच्या कारच्या धडकेत दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. अपघातानंतर अवघ्या पंधरा तासांत अल्पवयीन मुलाला सशर्त जामीन मिळाला...

Pune Porsche accident: Ajit Pawar's discussion with CP, strict action ordered in Kalyani Nagar accident case | Pune Porsche accident: अजित पवारांची सीपींसोबत चर्चा, कल्याणी नगर अपघाताप्रकरणी कडक कारवाईचे आदेश

Pune Porsche accident: अजित पवारांची सीपींसोबत चर्चा, कल्याणी नगर अपघाताप्रकरणी कडक कारवाईचे आदेश

पुणे : पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असे कृत्य केले असते तरी कारवाईचे आदेश दिले असते, अपघात प्रकरणाची चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाच्या कारच्या धडकेत दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. अपघातानंतर अवघ्या पंधरा तासांत अल्पवयीन मुलाला सशर्त जामीन मिळाला. या सर्व प्रकरणानंतर आता लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसदेखील ॲक्शन मोडवर आले आहेत.

हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले गेले. मात्र, टिंगरे यांनी हे आरोप बदनामी करण्यासाठी होत असल्याचे म्हटले. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत पुणेपोलिस आयुक्तांना फोन करीत चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या, असे आदेश दिले आहेत. “पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असे कृत्य केले असते तरी कारवाईचे आदेश दिले असते,” असेही ते म्हणाले.

Web Title: Pune Porsche accident: Ajit Pawar's discussion with CP, strict action ordered in Kalyani Nagar accident case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.