शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

मुलांसाठी पुणे पोलिसांची ‘पोलीस काका’ योजना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:22 PM

गुन्हे जर कमी करायची असेल तर त्यासाठी लहान वयातील मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देशालेय स्तरावर कम्युनिटी पोलिसिंगची सुरुवात गुन्हेगारी कमी करण्याकरिता पोलिसांची विशेष योजना

पुणे : ज्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिर्नींना शालेय जीवनात काही अडचण निर्माण झाल्यास त्यांना इतरांना ती अडचण सांगता येत नाही किंवा अडचण सांगण्यास संकोच वाटतो या विध्यार्थ्यांकरीता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सुरु केलेल्या ‘पोलीस काका’ ही योजनेची सुरु केली आहे. या योजनेची विस्तृत माहिती दिली. पुणे शहरातील गुन्हेगारी कमी करुन शहरात शांतता नांदावी या करीता पुणे शहर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांचे मोठया प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. या अंतर्गत पूर्वी गुन्हे केलेल्या व न्यायालयातून जामीनावर बाहेर आलेल्या आरोपींवर वेळोवेळी नजर ठेवुन त्यांच्या चालु कारवाया, सध्या ते काय आहेत याचे मॉनीटरींग पोलिसांच्या वतीने चालु आहे. तसेच ज्या भागात गुन्हे वारंवार घडतात त्या भागात पोलीसांचे ‘व्हिज्युअल पोलिसींग’ चालु असुन त्या अंतर्गत स्थानिक नागरिकांशी संपर्क साधुन एखादी घटना घडण्यापूर्वी त्याची माहिती पोलिसांना द्यावी यासाठी नागरिक गट तयार करुन त्यामध्ये पोलीस प्रतिनिधी काम करत आहे. ज्या भागामध्ये शाळा आहे. तेथील पोलीस काकांची विद्याथ्यांना ओळख करुन दिली व त्यांचे मोबाईल नंबर दिले, तसेच शालेय मुलींना शाळेच्या बाहेर किंवा अंतर्गत भागात काही त्रास असल्यास त्यांनी नि:संकोचपणे महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार सांगावी ज्यामध्ये स्कुल बस चालक,रस्त्यावरील टारगट मुले किंवा समाजातील इतर वाईट प्रवृत्तींकडून होणाऱ्या त्रासाचा समावेश होतो.  गुन्हे जर कमी करायची असेल तर त्यासाठी लहान वयातील मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना त्या क्षेत्राकडे वळू नये या करीता त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. प्रबोधनाकरीता शाळेपेक्षा दुसरी योग्य जागा मिळणे अशक्य आहे. याच संधीचा उपयोग करण्याचे दत्तवाडी पोलिसांनी ठरविले. त्यानुसार सध्या शालेय विश्वामध्ये स्नेह संमेलनाचे वारे मोठया प्रमाणात वाहू लागलेले आहे. या स्नेह संमेलनामध्ये आपल्या मुलांचे कला गुणांचे कौतुक करण्यासाठी पालक सुद्धा आवर्जून वेळ काढून उपस्थित राहतात . याचे औचित्य साधुन मुलांमध्ये आणि पालकामध्ये प्रबोधन करण्यासाठी रावसाहेब पटवर्धन हायस्कुल सिंहगड रोड व अरण्येश्वर इंग्लिश मिडियम स्कुल सहकारनगर या शाळेमध्ये स्नेह संम्मेलनाच्या वेळेत दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोनि गुन्हे कृष्णा इंदलकर, पोलीस उप निरीक्षक विकास जाधव , रुपाली कुलथे , सहा. पोलीस फौजदार रमेश मुजुमले, पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे , प्रविण जगताप ,साधना ताम्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल साळुखे, रोहन खैरे असे उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला .विद्यार्थ्यांना शाळे मध्ये घेवुन येणारी व घरी नेवुन सोडणारी स्कुल बस किंवा रिक्षा यामध्ये किती विद्यार्थी असावेत. लहान मुलांना दुचाकी चालविण्याचे लायसन नसताना काही पालक अति प्रेमापोटी वाहन चालवायला देतात. त्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्य ओळखून दुचाकी वाहने लायसन नसताना देवु नये. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे किती आवश्यक आहे.  याचे उदाहरणासह विश्लेषण या कार्यक्रमात केले. रावसाहेब पटवर्धन हायस्कुलचे वर्षा गुप्ते, शिवाजी खांडेकर, मुख्याध्यापिका हजारे मॅडम, अरण्येश्वर इंग्लिश मिडियम स्कुलचे बाळासाहेब ढुमे यांनी विशेष सहकार्य केले व पोलीस राबवत असलेल्या कम्युनिटी पोलिसींग या संकल्पनेचे स्वागत केले. यापुढे असे कार्यक्रम वेळोवेळी शालेय स्तरावर राबवावेत असे आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसStudentविद्यार्थी