पुण्यात एम जी रोडवर संशयास्पद बॅग आढळल्याने भीतीचे वातावरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 01:31 PM2021-11-10T13:31:38+5:302021-11-10T13:47:07+5:30

लष्कर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांना दहशतवाद व घातपात रोखण्यासाठी काय केले पाहिजे, आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर एक जागृत नागरिक म्हणून लक्ष ठेवले पाहिजे, बेवारस, संशयास्पद कुठलीही वस्तू, गाडी, बॅग दिसली तर लगेच पोलिसांना कळवा याबाबत मार्गदर्शन केले.

pune police mock drill on mg road | पुण्यात एम जी रोडवर संशयास्पद बॅग आढळल्याने भीतीचे वातावरण!

पुण्यात एम जी रोडवर संशयास्पद बॅग आढळल्याने भीतीचे वातावरण!

googlenewsNext

पुणे: मंगळवारी पुण्यातील एमजी रोडवरील एका मेडीकलसमोर एक संशयास्पद बॅग आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्याने नागरिकांमधील भीती कमी झाली. नेमकं हे प्रकरण काय होते ते जाणून घ्या... (mg road mock drill pune police) 

मंगळवारी वर्दळीच्या एम जी रोडवरील वेलनेस मेडिकल स्टोरच्या पायरीवर काळी बॅग ठेवत मॉक ड्रिल करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या जागृकतेचीही तपासणी लष्कर पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठांच्या परवानगीने करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या कल्पनेतून पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशतवाद व घातपातला रोखण्यासाठी, त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्दिष्टाने अँटी टेरेरिझम चेकिंग (डमी डिकोय) संदर्भात पोलिसांकडून अत्यंत गरिकांच्या वर्दळीच्या वेळेस सायंकाळी ६ वा सुमारास  एम जी रोडवरील वेलनेस मेडिकल स्टोअरच्या पायरीवर काळ्या रंगाची पिशवी ठेवण्यात आली होती.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार महाडिक, पोलीस कर्मचारी संभाजी दराडे व कदम हे साध्य वेशात त्या परिसरात लांब लांब नागरिकांच्या मध्ये जाऊन थांबले होते, आणि त्या बॅग बद्दल लोक तक्रार करतात की नाही हे निरीक्षण करीत असताना तेथील कपड्याच्या व्यापारी असलेले फरदिन खान यांनी याबाबत तात्काळ लष्कर पोलीस ठाण्याच्या बेवारस, संशयास्पद बॅग विषयी माहिती दिली. पोलीस येईपर्यंत त्यभागातील नागरिक ना व्यापारी थोडे घाबरलेले होते. परंतु पोलीस तेथे यातच पोलिसांनी ही मॉक ड्रिल आहे घाबरू नका, जागृत राहा असे सांगता सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

त्यानंतर लष्कर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांना  दहशतवाद व घातपात रोखण्यासाठी काय केले पाहिजे, आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर एक जागृत नागरिक म्हणून लक्ष ठेवले पाहिजे, बेवारस, संशयास्पद कुठलीही वस्तू, गाडी, बॅग दिसली तर लगेच पोलिसांना कळवा याबाबत मार्गदर्शन केले. अशोक कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर ठाणे)- प्रत्येक नागरिकांनी जागृत असणे महत्त्वाचे आहे, पोलीस समाजातल्या मदतीसाठी आहे सामाजिक सुरक्षा, आरोग्य राखण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांनी सोबत काम केले पाहिजे, कुठल्याही गोष्टीचा संशय आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशन ला लगेच कळवा.

Web Title: pune police mock drill on mg road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.