पुण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याचं पत्र वाचून व्हाल हैराण! सुट्टीसाठी सांगितलेलं कारण एकदा वाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 14:58 IST2022-06-02T14:56:48+5:302022-06-02T14:58:37+5:30

सुट्टी हवी म्हणून कर्मचारी नानाविध कारणं देत असतात. यातून अनेक गंमतीजमती किंवा किस्सेही घडतात.

Pune police constable letter to senior for leave goes viral in social media | पुण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याचं पत्र वाचून व्हाल हैराण! सुट्टीसाठी सांगितलेलं कारण एकदा वाचाच...

पुण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याचं पत्र वाचून व्हाल हैराण! सुट्टीसाठी सांगितलेलं कारण एकदा वाचाच...

पुणे

सुट्टी हवी म्हणून कर्मचारी नानाविध कारणं देत असतात. यातून अनेक गंमतीजमती किंवा किस्सेही घडतात. असाच एक किस्सा पुण्यात घडला आहे. पोलीस कर्मचाऱ्यानं सुट्टीसाठी दिलेल्या हटके कारणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

एका पत्राद्वारे हे सुट्टीचं हटके कारण पुढं आलं आहे. पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सुट्टीबाबतच्या या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. वरिष्ठांना लिहीलेलं हे पत्र वाचून तुम्हीही हैराण व्हाल. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये रुजू असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला सुट्टी हवी होती. मग वरिष्ठांना पोलीस कर्मचाऱ्यानं रितसर पत्र लिहीलं. मात्र सुट्टीसाठीचं कारण वाचून वरिष्ठांनीही डोक्यावर हात मारला. 

आपल्या सहकाऱ्यासाठी चिलापी आणि रव मासे घेऊन यायचे आहेत, त्यासाठी दोन दिवस सुट्टी द्यावी असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. खडक पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एस. डी. शिंदे यांनी हे पत्र लिहिलं आहे. सोलापूर येथून हे मासे आणायचे असल्यानं साप्ताहिक सुटीला जोडून एक सुट्टी द्यावी अशी विनंती या पत्रात शिंदे यांनी वरिष्ठांना केली आहे. पोलीस हवालदाराच्या या प्रामाणिकपणाची आणि या पत्राची चर्चा सध्या सोशल मीडियात खूप रंगत आहे. 

Web Title: Pune police constable letter to senior for leave goes viral in social media