पुणे : शहरात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पुणेपोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. शहरात विशेषत: उपनगरात लहान मुलांना पळवून नेले जात आहे. परागावातील टोळी पुण्यात आली आहे, अशी अफवा सोशल मीडियाद्वारे प्रसारित केली जात आहे. अशा प्रकारचे मेसेज प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे.
नागरिकांना अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर आढळून आल्यास विश्वास ठेऊ नका किंवा अशा प्रकारचे मेसेज व्हायरल करु नका. सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज प्रसारित करणे टाळावे. संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा पोलिस नियंत्रण कक्ष (११२) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Web Summary : Pune Police deny rumors of child kidnappings circulating on social media. They urge citizens to avoid sharing unverified messages and report suspicious activity to the police immediately via 112.
Web Summary : पुणे पुलिस ने सोशल मीडिया पर बच्चों के अपहरण की अफवाहों का खंडन किया। नागरिकों से आग्रह किया है कि वे अपुष्ट संदेशों को साझा न करें और संदिग्ध गतिविधि की सूचना तुरंत पुलिस को 112 पर दें।