शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपीचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:33 IST

अजित पवार यांना निमंत्रण न देण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  

पुणे - पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य ‘धनगरी नाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात तब्बल ५०,००० धनगरी ढोल वाजवणार आहे, महाराष्ट्रातील विविध भागांतील धनगर बांधव यात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र निमंत्रण दिलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे.पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, हा कार्यक्रम सरकारचा नाही, धनगर समाजाचा आहे. समाजाच्या भावना आणि निर्णय यानुसारच कोणाला बोलवायचं हे ठरतं. त्यामुळे अजित पवार यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवार यांना निमंत्रण न देण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  यावेळी ‘फुले’ चित्रपटाविषयीही त्यांनी मत व्यक्त करताना राज्यात सध्या जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत सुरू झाली आहे. सत्ता गेली की नवीन इतिहासकार जन्माला येतात. यांच्यावर सरकारने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली.

अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवींचं कार्य जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. त्या काळात महिलांनी केलेलं राज्यकारभाराचं काम हे प्रेरणादायी आहे. त्यामुळे धनगर समाजाने ठरवलं आहे की त्यांचं स्मरणही भव्य आणि अभूतपूर्व पद्धतीने व्हावं." या कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद होईल असा प्रयत्न केला जाणार असून, सुमारे ५०० गजर मंडळं  सहभागी होणार आहेत. एक गजर मंडळ सुमारे ५० कलाकार घेऊन येणार आहे. "ढोल म्हणजे शक्तीचा नाद, भक्तीचा आवाज, आणि जनतेचा हुंकारधनगर समाजातील परंपरा, चालीरीती, ढोल वादनाची सांस्कृतिक समृद्धी आणि समाज संघटन या सगळ्यांचा संगम या कार्यक्रमात होणार आहे. "हे नुसतं ढोल वादन नाही, तर संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे," असं सांगत त्यांनी राज्यातील सर्व धनगर बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केलं.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाह