व्यंकोजी खोपडे यांचे नगरसेवक पद रद्द करावे; वसंत मोरे यांची न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:58 IST2026-02-05T12:57:51+5:302026-02-05T12:58:44+5:30

भाजपचे नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांचे अनधिकृत बांधकाम आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे.

pune news vyankaji Khopde's corporator post should be cancelled; Vasant More's petition in court | व्यंकोजी खोपडे यांचे नगरसेवक पद रद्द करावे; वसंत मोरे यांची न्यायालयात याचिका

व्यंकोजी खोपडे यांचे नगरसेवक पद रद्द करावे; वसंत मोरे यांची न्यायालयात याचिका

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मधील ई मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांचे अनधिकृत बांधकाम आहे. त्यामुळे खोपडे यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी करणारी याचिका उद्धवसेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी न्यायालयात दाखल केली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३८ मधील ई मधून भाजपचे नगरसेवक व्यंकोजी खोपडे हे उद्धवसेनेचे वसंत मोरे यांच्या विरोधात निवडून आले आहेत. पण नगरसेवकाने अनधिकृत बांधकाम केले असेल, तर त्यांचे नगरसेवकपद रद्द होते.

भाजपचे नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांचे अनधिकृत बांधकाम आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे. तसेच पालिकेत समाविष्ट गावामधील नोकर भरतीत ते विभागीय आयुक्तांपुढील चौकशीत दोषी ठरले असल्याचा दावा वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Web Title : वेंकजी खोपड़े का पार्षद पद रद्द हो; वसंत मोरे की न्यायालय में याचिका

Web Summary : वसंत मोरे ने भाजपा पार्षद वेंकजी खोपड़े को अवैध निर्माण और भर्ती में कदाचार के आरोपों के कारण हटाने की मांग करते हुए अदालत में याचिका दायर की।

Web Title : Venkaji Khopade's corporator position should be revoked; Vasant More's petition in court.

Web Summary : Vasant More filed a petition in court seeking the removal of BJP corporator Venkaji Khopade due to alleged illegal construction and misconduct in recruitment.