Video : मेधा कुलकर्णींची गरबा नाईटवर धाड अन् पुढे काय घडलं…
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:36 IST2025-09-28T12:33:05+5:302025-09-28T12:36:47+5:30
या व्हिडिओत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, परिसरातील लोकांना या आवाजाचा खूप त्रास होतो. मला गेल्या काही तासात अनेक स्थानिक नागरिकांचे फोन आले.

Video : मेधा कुलकर्णींची गरबा नाईटवर धाड अन् पुढे काय घडलं…
पुणे - पुण्यातील भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेला गरबा कार्यक्रम बंद पाडला. कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका ठेवत खासदार कुलकर्णी यांनी आयोजकांना जाब विचारला. दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, परिसरातील लोकांना या आवाजाचा खूप त्रास होतो. मला गेल्या काही तासात अनेक स्थानिक नागरिकांचे फोन आले. या परिसरात कॅन्सर झालेले पेशंट आहे तसेच ९ ० वर्षांची महिला आहे. त्यांना या आवाजाचा त्रास होतो मागेही या परिसरात दहीहंडी झाली तेव्हा सुद्धा आवाजाची तक्रार मला आली होती. या परिसरातील आजी असेल, आजोबा असतील, लहान मुलं असतील, त्यांना या आवाजाचा त्रास सहन करावा लागतोय. आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम सुरू ठेवले जात होते. याबाबत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन मी स्वतः जाऊन कार्यक्रम बंद पाडला, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, परिसरातील अनेक नागरिकांनीही वाढलेल्या आवाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. कार्यक्रम अचानक थांबल्याने काही तरुणांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी खासदारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. या घटनेनंतर गरबा आयोजक आणि प्रशासन यांच्यात जबाबदारी टाळण्याची स्पर्धा सुरू झाली असून, पुढील कारवाईबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.