Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 21:35 IST2025-07-11T21:34:29+5:302025-07-11T21:35:26+5:30
- घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवले.नागरिकांच्या या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.

Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
पुणे - शिवाजीनगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलाजवळ आज अचानक पीएमटी बसला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे : शिवाजीनगर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलाजवळ पीएमटी बसला आग#Pune#PMTBuspic.twitter.com/banhSV2Qkj
— Lokmat (@lokmat) July 11, 2025
अधिकच्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवले.नागरिकांच्या या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. मात्र,अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचे निदर्शनास आले. बसमध्ये आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस व पीएमटी प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.