'बुधवार पेठ ते घर..'पाठलाग करून व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;दोघांना नांदेड सिटी पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:12 IST2025-07-16T11:11:55+5:302025-07-16T11:12:11+5:30
आरोपींनी तरुणाचे बुधवार पेठेत जातांनाचे व्हिडिओ काढले. हा तरुण जेव्हा घरी जात होता तेव्हा त्याचा पाठलाग करत त्याच्या घरी नांदेड सिटीत पोहोचले.

'बुधवार पेठ ते घर..'पाठलाग करून व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;दोघांना नांदेड सिटी पोलिसांनी केली अटक
पुणे : बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला धमकावत वीस हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी तरुणावर वीस हजार रुपयांची मागणी केल्याचीही माहिती समोर येत आहे.
अधिकच्या माहितीनुसार, आरोपींनी तरुणाचे बुधवार पेठेत जातांनाचे व्हिडिओ काढले. हा तरुण जेव्हा घरी जात होता तेव्हा त्याचा पाठलाग करत त्याच्या घरी नांदेड सिटीत पोहोचले. या आरोपींनी तेथे तरुणाला अडवले. यावेळी त्याच्यावर खोटे आरोप केले की तू आमच्या कडून वीस हजार रुपये घेतलेले परत कर नाही तर आम्ही पोलिसांना कॉल करून तुझी तक्रार करू,पैसे परत दे नाही तर ,आम्ही तुझे बुधवार पेठेत जातांनाचे व्हिडिओ व्हायरल करू, एवढेच नाही तर या आरोपींची तरुणाला धमकवताना पोलिस हेल्पलाईन 112 वर कॉल करून उलट तक्रार करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना कॉल जाताच त्यांनी या घटनेची दाखल घेतली घटनस्थळी येताच चौकशीत आरोपी ब्लॅकमेल करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली. अधिक तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत.