पुणेकरांसाठी वाहतूक पोलिसांची भन्नाट ऑफर; नियम मोडणारे कळवा अन् ५० हजार मिळवा 

By किरण शिंदे | Updated: February 12, 2026 17:57 IST2026-02-12T17:56:55+5:302026-02-12T17:57:35+5:30

नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होत असली तरी दंड भरून अनेक चालक सुटका करून घेतायत.

Pune news Traffic police's amazing offer for Pune residents; Report rule breakers and get Rs 50,000 | पुणेकरांसाठी वाहतूक पोलिसांची भन्नाट ऑफर; नियम मोडणारे कळवा अन् ५० हजार मिळवा 

पुणेकरांसाठी वाहतूक पोलिसांची भन्नाट ऑफर; नियम मोडणारे कळवा अन् ५० हजार मिळवा 

पुणे - पुण्यात वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचे नियमभंग करणारे वाहनचालक हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, नो-एंट्रीतून वाहन चालवणे, रॅश ड्रायव्हिंग, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे अशा प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होत असली तरी दंड भरून अनेक चालक सुटका करून घेतायत.

याच पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून नियमभंगाला आळा घालण्यासाठी एक वेगळी योजना सुरू केली आहे. ‘पीटीपी’ (Pune Traffic Police) या अधिकृत मोबाईल अ‍ॅपद्वारे नागरिकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत.

महिन्याभरात सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या नागरिकाला ५० हजार रुपयांचे पहिले बक्षीस दिले जाणार आहे. दुसरे बक्षीस २५ हजार रुपये आणि तिसरे बक्षीस १५ हजार रुपये असे जाहीर करण्यात आले आहे.

वाहतूक विभागाचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अ‍ॅपमध्ये १३ प्रकारच्या नियमभंगाचा समावेश करण्यात आला आहे. ट्रिपल सीट, फुटपाथवर पार्किंग, फॅन्सी नंबर प्लेट, रॅश ड्रायव्हिंग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर अशा विविध प्रकारांवर नागरिक थेट पुरावा अपलोड करू शकतात. प्रत्येक तक्रारीची सखोल पडताळणी केली जाते आणि माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही योजना पुढील सहा महिन्यांसाठी राबवण्यात येणार असून डिसेंबर महिन्याचे विजेते नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्याचे विजेतेही लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. नागरिकांच्या सहभागातून शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Web Title : पुणे पुलिस की पेशकश: यातायात नियम तोड़ें, 50,000 रुपये जीतें!

Web Summary : पुणे ट्रैफिक पुलिस ने 'पीटीपी' ऐप के माध्यम से यातायात नियमों का उल्लंघन करने वालों की रिपोर्ट करने वाले नागरिकों को पुरस्कृत करने की योजना शुरू की। शीर्ष पुरस्कार: ₹50,000। उल्लंघनों में ट्रिपल राइडिंग, फुटपाथ पार्किंग और रैश ड्राइविंग शामिल हैं। पहचान गोपनीय है। योजना का उद्देश्य यातायात अनुशासन में सुधार करना है।

Web Title : Pune Police Offer: Report Traffic Violations, Win ₹50,000!

Web Summary : Pune Traffic Police launched a scheme rewarding citizens who report traffic violations via the 'PTP' app. Top prize: ₹50,000. Violations include triple riding, footpath parking and rash driving. Identities are confidential. Scheme aims to improve traffic discipline.