पाच वर्षात झोपटपट्टी मुक्त बारामतीकरण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य;नगराध्यक्ष सचिन सातव यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:01 IST2026-01-01T19:00:00+5:302026-01-01T19:01:35+5:30
मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येइल.१९६७ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीच्या विकासाचा पाया रचला.

पाच वर्षात झोपटपट्टी मुक्त बारामतीकरण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य;नगराध्यक्ष सचिन सातव यांची ग्वाही
बारामती - दिर्घकाळ ‘व्हीजन’ ठेवून उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वप्नातील बारामती घडविण्याचा आम्हा सर्वांचा मानस आहे. यामध्ये पाच वर्षात ‘टाॅप फाइव्ह’ मध्ये सर्वात झोपटपट्टी मुक्त बारामती करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार आहे.त्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे.बर्याच वर्षांपासुन असणारा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी साथ मिळावी. बारामतीत सर्वांगिण विकास करताना समाजाच्या सर्वच घटकांना सोबत घेऊन जाण्याचा व शहरातील सर्वच प्रभागात तेथील प्राधान्यक्रम निश्चित करुन त्या नुसार विविध विकासकामे आम्ही हाती घेणार असल्याचे बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले.
बारामती नगरपरीषदेचा कार्यभार नगराध्यक्ष सातव यांनी गुरुवारी(दि १) स्वीकारला.यावेळी मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी पत्रकारांशी बोलताना सातव पुढे म्हणाले,नागरिकांचे मुलभूत प्रश्न स्वच्छता, पुरेसे पिण्याचे पाणी, खड्डेमुक्त रस्ते, नव्याने होत असलेल्या उपनगरात भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंगची रामस्या दूर करण्यासह आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर भर देणार आहे.शहराच्या विकासासाठी पंचसुत्री अवलंबली आहे.यामध्ये मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येइल.१९६७ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीच्या विकासाचा पाया रचला.
त्याला गतीमान करुन पुढे नेण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी मगाील ४० वर्षात केले.सर्वच पवार कुटुंबाची त्याला साथ लाभली.शहरात नागरीकांच्या तक्रारी वेळेत सोडविण्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात येतील.गरज पडल्यास आम्ही थेट तक्रारदारांपर्यंत पोहचु.आम्ही सर्व नगरसेवक टीम वर्क म्हणुन काम करु,त्यांची साथ मला महत्वाची आहे.शहराच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणे, हाच माझा दृष्टिकोन आहे. निवडणूक संपल्यानंतर आता राजकीय भूमिका दूर ठेवून शहरासाठी सर्वच घटकांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका असेल,असे सातव म्हणाले
बारामतीतील प्रत्येक प्रभागात नगरसेकांसमवेत समन्वय ठेवत स्वताः फिरुन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असेल. या शिवाय मोबाईल अँपच्या माध्यमातून घरबसल्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्याचे निराकरण आम्ही ठराविक कालावधीत कसे करु याचा प्रयत्न करणार आहोत. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून गानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी एआयची मदत घेवू. नागरिकांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी आमची दारे कायमच खुली असतील,असे नगराध्यक्ष सचिन सातव म्हणाले.