Video :पुण्यात पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली; कारवाई होणार का? ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:58 IST2026-02-21T11:58:15+5:302026-02-21T11:58:54+5:30

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर कारवाई होणार का ?  असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

pune news today Video Pune police flouting rules, will action be taken? Triple seater driving video goes viral | Video :पुण्यात पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली; कारवाई होणार का? ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल

Video :पुण्यात पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली; कारवाई होणार का? ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल

पुणे -  सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असून या व्हिडिओत महिला पोलीस कर्मचारी ट्रिपल सीट प्रवास करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर कारवाई होणार का ? असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. अद्याप अधिकृत निवेदन आलेले नसले तरी अंतर्गत चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
दरम्यान, वाहतूक नियमांनुसार दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करण्यास मनाई आहे. सामान्य नागरिकांवर दंड आकारला जातो, त्यामुळे पोलिस कर्मचारीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे मत आहे.  


 
या व्हिडिओवर नागरिकांकडून पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आल्यानंतरच नेमकी कारवाई स्पष्ट होईल. मात्र, चौकशी सुरू झाल्यास पुढील काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला यावर असून  संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.

Web Title : पुणे पुलिस ने नियमों का उल्लंघन किया: ट्रिपल राइडिंग वीडियो से आक्रोश, जांच संभव

Web Summary : पुणे में पुलिस कर्मियों द्वारा ट्रिपल राइडिंग करते हुए एक वीडियो वायरल हो गया है, जिससे जनता में आक्रोश है। नागरिकों ने सभी के लिए समान नियमों का हवाला देते हुए कार्रवाई की मांग की है। एक आंतरिक जांच की उम्मीद है, और जल्द ही निर्णय आने की संभावना है। वीडियो सोशल मीडिया पर मिश्रित प्रतिक्रियाएं उत्पन्न कर रहा है।

Web Title : Pune Police Violate Rules: Triple Riding Video Sparks Outrage, Inquiry Likely

Web Summary : A video showing Pune police personnel triple riding a bike has gone viral, sparking public outrage. Citizens demand action, citing equal rules for all. An internal inquiry is expected, and a decision is anticipated soon. The video is generating mixed reactions on social media.