केरळमध्ये यंदाच्या निवडणुकीत बदल घडेल;माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:51 IST2026-03-03T11:50:34+5:302026-03-03T11:51:08+5:30

- मोदींच्या विकसित भारतावर केरळमधील जनतेने विश्वास ठेवल्याने राजधानी 'तिरुवनंतपूरम' ही महापालिका भाजपने नुकतीच जिंकली.

pune news this year elections will bring change in Kerala; Former Union Minister Prakash Javadekar expressed confidence | केरळमध्ये यंदाच्या निवडणुकीत बदल घडेल;माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला विश्वास

केरळमध्ये यंदाच्या निवडणुकीत बदल घडेल;माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे'मागील ७० वर्षे केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूडीएफ) यांची सत्ता आहे. यामुळे केरळचा विकास खुंटला आहे. आता मोदींच्या विकसित भारतावर केरळमधील जनतेने विश्वास ठेवल्याने राजधानी 'तिरुवनंतपूरम' ही महापालिका भाजपने नुकतीच जिंकली.

गुजरातमध्येही भाजपच्या यशाची सुरुवात याप्रमाणेच झाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत केरळमध्ये बदल घडेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. जावडेकर म्हणाले, केरळमध्ये शबरीमला मंदिराविषयी झालेला वाद यंदाच्या जनसंघाच्या काळात केरळमध्ये भाजपला दोन टक्के मते मिळतः आता हे प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

विकसित केरलम हा अजेंडा

भाजपने गुजरातमध्ये अहमदाबाद महापालिका पहिल्यांदा जिंकली. त्यानंतर पक्षाच्या कामगिरीत सुधारणा होत गेली. गेल्या तीस वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेवर आहे.तब्बल ४७वर्षे डाव्यांचा बालेकिल्ला असलेली तिरुवनंतपूरम महापालिका भाजपने जिंकली आहे.हे भाजपच्या आगामी यशाचे द्योतक असून, केरळमध्ये बदलाचे वारे जोरदार वाहत आहेत. केरळमधील जनतेला केंद्राच्या योजनांचा लाभ मिळाला आहे. विकसित निवडणुकीत केंद्रस्थानी ठरणार आहे.

मंदिर प्रवेशाबाबत डाव्यांनी घेतलेली भूमिका केरळच्या जनतेला पटलेली नाही.सर्वोच्च न्यायालयात त्यांची भूमिका उघडी पडेल. येथील मंदिरांमधील चोरी आणि देवस्थाने ताब्यात घेण्यावरूनही जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. तसेच 'अयप्पा संगमम'मध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार नुकत्याच करण्यात आलेल्या लेखापरीक्षणातून उघड झाला आहे.

Web Title: pune news this year elections will bring change in Kerala; Former Union Minister Prakash Javadekar expressed confidence