आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा संपणार; लवकरच निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:15 IST2026-04-08T18:15:15+5:302026-04-08T18:15:44+5:30

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठीची सोडत दि. ६ एप्रिल रोजी पार पडली. ...

pune news the wait for RTE admission will end; Selection and waiting list will be announced soon | आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा संपणार; लवकरच निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा संपणार; लवकरच निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

पुणे :शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठीची सोडत दि. ६ एप्रिल रोजी पार पडली. आता विद्यार्थ्यांच्या निवड व प्रतीक्षा याद्यांकडे पालकांचे लक्ष लागले आहे. शिक्षण विभागाकडून पुढील दोन दिवसांत या याद्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यादी जाहीर झाल्यानंतर शाळास्तरावर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्यात यंदा ८ हजार ७०१ शाळांमधील एकूण १ लाख १४ हजार ८२६ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. दि. ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत तब्बल २ लाख ८९ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जांची संख्या किंचित घटली आहे. दरम्यान, काही ठिकाणी पालकांना प्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास संबंधित पालकांनी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शिक्षण विभागाकडे पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संगणकीकृत असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही. त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने राबवली जात आहे.

आरटीई प्रवेशासाठी निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसांत यादी ऑनलाइन जाहीर करण्यात येईल. - शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण

Web Title : आरटीई प्रवेश का इंतजार खत्म; जल्द ही चयन और प्रतीक्षा सूची जारी

Web Summary : आरटीई प्रवेश चयन और प्रतीक्षा सूची 6 अप्रैल को लॉटरी के बाद जल्द ही जारी की जाएगी। महाराष्ट्र में 1.14 लाख सीटों के लिए 2.89 लाख से अधिक आवेदन प्राप्त हुए। माता-पिता को धोखाधड़ी वाले प्रस्तावों के खिलाफ चेतावनी दी जाती है; अधिकारीयों के पास शिकायत दर्ज करा सकते हैं।

Web Title : RTE Admission Wait Ends Soon; Selection & Waiting Lists Coming

Web Summary : RTE admission selection and waiting lists are coming soon after the lottery on April 6th. Over 2.89 lakh applications were received for 1.14 lakh seats in Maharashtra. Parents are warned against fraudulent offers; complaints can be lodged with authorities.