'येळकोट येळकोट जय मल्हार' गजरात वडज परिसर दुमदुमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:40 IST2026-02-01T18:39:13+5:302026-02-01T18:40:07+5:30

"येळकोट येळकोट, जय मल्हार" या नामघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

pune news the Vadaj area was filled with the sound of Yelkot Yelkot Jai Malhar | 'येळकोट येळकोट जय मल्हार' गजरात वडज परिसर दुमदुमला

'येळकोट येळकोट जय मल्हार' गजरात वडज परिसर दुमदुमला

सावरगाव : श्री तीर्थक्षेत्र वडज येथे माघ पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकुलस्वामी खंडेराय देवस्थानच्या वतीने सकाळी महाअभिषेक व आरती करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तद्नंतर श्रींच्या पालखीची मिरवणूक वडज गाव ते कुलस्वामी मंदिर मार्गे पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली.

यात्रा शौकिनांसाठी बैलगाडा यात्रेचे देखील दिवसभर आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे, नवी मुंबई, ठाणे व मुंबई येथून अनेक भाविक भक्त कुलस्वामी खंडेरायाच्या दर्शनासाठी सहकुटुंब येतात.

"येळकोट येळकोट, जय मल्हार" या नामघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी देवस्थानच्या वतीने अन्नदान तसेच इतर सुविधांची व्यवस्थापन केले होते, अशी माहिती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विवेक रामदास चव्हाण यांनी दिली.

Web Title : 'येळकोट येळकोट जय मल्हार' के जयकारों से वडज क्षेत्र गूंजा।

Web Summary : वडज में माघ पूर्णिमा उत्साह से मनाई गई। कुलस्वामी खंडेराय की पालकी यात्रा और महाप्रसाद वितरण हुआ। दर्शन के लिए विभिन्न शहरों से भक्त आए। 'येळकोट येळकोट जय मल्हार' से क्षेत्र गूंज उठा। मंदिर ट्रस्ट ने भोजन और सुविधाएं प्रदान कीं।

Web Title : 'Yelkot Yelkot Jai Malhar' chants resonate in Vadaj area.

Web Summary : Vadaj celebrated Magh Purnima with enthusiasm. Kulaswami Khanderai's palanquin procession and Mahaprasad distribution occurred. Devotees from various cities visited for darshan. The area echoed with 'Yelkot Yelkot Jai Malhar'. The temple trust provided food and facilities.