रंग, गुलाल अन् ‘नाथसाहेबांचं चांगभलं’च्या गजरात वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेची पारंपरिक हाणामारीने सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:16 IST2026-02-13T14:15:33+5:302026-02-13T14:16:24+5:30

मानाच्या सर्व पालख्या व काठ्यांसह पहाटे देवाचे मानकरी लक्ष्मण शिंगाडे यांची भाकणूक झाली. त्यानंतर छबिन्याची सांगता झाली.

pune news the Srinath Mhaskoba Yatra concludes with a traditional brawl in Veer, amidst the sounds of colors, gulal and 'Nath Saheb's good fortune' | रंग, गुलाल अन् ‘नाथसाहेबांचं चांगभलं’च्या गजरात वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेची पारंपरिक हाणामारीने सांगता

रंग, गुलाल अन् ‘नाथसाहेबांचं चांगभलं’च्या गजरात वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेची पारंपरिक हाणामारीने सांगता

सासवड : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांच्या बारा दिवसांच्या यात्रेची सांगता बुधवारी (दि. १२) पारंपरिक “रंगाचे शिंपण” अर्थात “हाणामारी” या उत्सवाने जल्लोषात झाली. गुलाल व खोबऱ्याच्या मुक्त उधळणीत आणि “नाथसाहेबांचं चांगभलं, सवाई सर्जाचं चांगभलं” या जयघोषात लाखो भाविकांनी या ऐतिहासिक यात्रेला साक्ष दिली.

आज यात्रेचा मुख्य दिवस होता. सोमवारी रात्री देऊळवाड्यात छबिन्याला सुरुवात झाली. मानाच्या सर्व पालख्या व काठ्यांसह पहाटे देवाचे मानकरी लक्ष्मण शिंगाडे यांची भाकणूक झाली. त्यानंतर छबिन्याची सांगता झाली. दुपारी १२:३० वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई व सोनवडी येथील श्रीनाथ म्हस्कोबांच्या मानाच्या पालख्या, काठ्या, अब्दागिरी, निशाण, छत्री, डोलारा व दागिनेदार लवाजम्यासह मंदिरात दाखल झाल्या.

छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दुपारी १ वाजता देवाचे मानकरी दादा बुरुंगुले व तात्या बुरुंगुले यांच्या अंगात देव संचारला. यावेळी वार्षिक पीकपाण्याची भाकणूक झाली. भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची उधळण करत “श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं”चा गजर केला.

दुपारी ठीक १:३० वाजता देवाचे मानकरी भारत जमदाडे (माथेरान) व जमदाडे परिवाराच्या वतीने रंगाचे शिंपण करण्यात आले. त्यानंतर सर्व पालख्या व काठ्यांची पुन्हा एक प्रदक्षिणा होऊन दुपारी २ वाजता देऊळवाड्याबाहेर पारंपरिक हाणामारीने यात्रेची सांगता झाली. दिवसभरात पाच लाख भाविकांनी दर्शन व यात्रेत सहभाग नोंदविला.

यात्रेनिमित्त मंदिर व परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण, वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र मैदाने, सासवड पोलिस स्टेशन व ग्रामसुरक्षा दलाचा चोख बंदोबस्त, जादा एसटी बससेवा, आरोग्य सुविधा आदी व्यवस्था करण्यात आल्या होत्या. या यशस्वी नियोजनासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, सासवड व जेजुरी नगर परिषद, बांधकाम विभाग, महावितरण, पोलिस प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासकीय विभागांचे, तसेच भाविकांचे देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी आभार मानले.

उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व पोलिस निरीक्षक कुमार कदम (सासवड) यांनी एक दिवस आधी विश्वस्त मंडळासोबत बैठक घेऊन गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन केले होते. देवस्थानचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांनी सहकारी विश्वस्त, सल्लागार मंडळ, यात्रा समिती, सरपंच, ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

Web Title : श्री नाथ म्हस्कोबा यात्रा पारंपरिक 'हनुमारी' उत्सव के साथ संपन्न।

Web Summary : वीर में श्री नाथ म्हस्कोबा यात्रा 'हनुमारी' के साथ संपन्न हुई, जिसमें रंगों और उल्लास का उत्सव था। लाखों लोगों ने 'चांगभला' के नारों और गुलाल की बौछार के साथ इस कार्यक्रम को देखा, जो बारह दिवसीय त्योहार के अंत का प्रतीक था।

Web Title : Shri Nath Mhaskoba Yatra concludes with traditional 'Hanamari' celebration.

Web Summary : Shri Nath Mhaskoba Yatra at Veer concluded with 'Hanamari,' a vibrant celebration involving colors and revelry. Lakhs witnessed the event, marked by the chants of 'Changbhala' and the showering of gulal, signifying the end of the twelve-day festival.