युद्धाचा विळखा स्वयंपाकघराला..! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:46 IST2026-03-08T13:46:25+5:302026-03-08T13:46:48+5:30

- सामान्यांना याचा फटका, गृहिणींचे बजेट कोलमडले

pune news the pain of war has hit the kitchen..! Domestic gas cylinders have become more expensive by Rs 60 | युद्धाचा विळखा स्वयंपाकघराला..! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला

युद्धाचा विळखा स्वयंपाकघराला..! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला

पुणे : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे गडद सावट आता थेट सर्वसामान्यांच्या ताटावर पडू लागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे इंधन कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची मोठी वाढ केली आहे. पुण्यातील गृहिणींचे बजेट यामुळे पूर्णपणे कोलमडले असून, सामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आधी जीवनाआवश्यक वस्तू महागल्या आहेत. त्यात आता घरगुती गॅस सिलिंडर दरात वाढ झाल्याने सामान्यांना यांची झळ बसत आहे.

- महागाईचा 'ब्लास्ट': आजपासून नवे दर लागू

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा फटका भारतालाही बसत असून, तेल कंपन्यांनी पहाटेपासूनच गॅसचे नवीन दर लागू केले आहेत. पुण्यात आता गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा ६० रुपये जादा मोजावे लागत आहेत. ८५६ वरून आता ९१६ रुपयांवर केला आहे. त्यात वस्ती पातळीवर आणि सोसायटीत जागेवर पोहच करण्यासाठी जादा २० ते ३० रुपये द्यावे लागत आहे. त्याचा फटका ही सामान्यांना सहन करावा लागत आहे.

-अशी आहेत दरवाढीची प्रमुख कारणे  

- युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल वाढले आहेत.

- आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर मर्यादा आल्याने आयात खर्च वाढला आहे.

- पुरवठा साखळीत अडथळा

- डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

- सामान्यांच्यांचे असेही संतप्त सूर
 

"आधीच डाळी, तेल आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात आता गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागल्याने महिन्याचे गणित कसे जुळवायचे, हा मोठा प्रश्न आहे - सुनीता शहाणे गृहणी, धनकवडी. 

युद्धजन्य परिस्थितीचा सामान्यांना जोरदार फटका बसत आहे व्यावसायिक गॅसला बरोबर आता घरगुती सिंलिडर गॅस नवीन दराची अंमलबजावणी आजपासूनच सुरू झाली असून, बुकिंग केलेल्या ग्राहकांनाही नवीन दरानेच पैसे मोजावे लागले आहेत. - दीप्ती वायदंडे 

Web Title : युद्ध का असर: घरेलू गैस सिलेंडर की कीमतों में वृद्धि, परिवारों पर बोझ

Web Summary : युद्ध के कारण वैश्विक तेल की कीमतों में वृद्धि से भारतीय परिवार प्रभावित। पुणे में एलपीजी सिलेंडर की कीमतें ₹60 बढ़ीं, जिससे बजट पर दबाव। आपूर्ति श्रृंखला में व्यवधान और कमजोर रुपये ने वृद्धि में योगदान दिया, जिससे आवश्यक लागत बढ़ने पर जनता में आक्रोश है।

Web Title : War's Impact: Domestic Gas Cylinder Price Hikes Burden Households

Web Summary : War-induced global oil price surge hits Indian households. LPG cylinder prices rise by ₹60 in Pune, straining budgets. Supply chain disruptions and a weaker rupee contribute to the increase, sparking public anger as essential costs soar.