शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६ लाख; ॲग्रिस्टॅक योजनेतून आकडेवारी स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:24 IST

- एकूण नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या दहा लाख

पुणे : जिल्ह्यात एकूण दहा लाख शेतकरी कागदोपत्री असले तरी केवळ सहा लाख शेतकरीच खरे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान खरीप पीकविमा, पीएम किसान यासह कृषी विभागाच्या सर्वच योजनांना योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेत नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आली असले तरी जिल्ह्यातील केवळ सहा लाख शेतकऱ्यांनीच हा ओळख क्रमांक घेतला आहे. त्यामुळे अन्य ४० टक्के नागरिकांच्या नावावर शेती असली तरी ते शेतीच करत नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जमाबंदी आयुक्तांना कळविले आहे.

राज्यात शेतकरी, त्यांच्या नावावरील शेती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडून अधिकार अभिलेखात नावनोंदणी करण्यात येत आहे. यातून ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष शेती नावावर असलेल्यांची संख्या जास्त असून, ओळख क्रमांक घेतलेल्यांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी अशा शेतकऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातही अशी पडताळणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्व १३ तालुक्यांत १० लाख ३९ हजार १०१ नागरिकांच्या नावावर सातबारा उतारा अर्थात शेती आहे. त्यात सर्वाधिक १ लाख २६ हजार ८९ शेतकरी बारामती तालुक्यात आहेत, तर हवेली तालुक्यात ही संख्या ५९ हजार ४१६ शेतकरी आहेत. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान आणि पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.आतापर्यंत ५ लाख ४२ हजार ५५६ शेतकऱ्यांनाच ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक देण्यात आला असून, अजून ८४ हजार १३० शेतकऱ्यांना तो देता येईल असा अहवाल जमाबंदी आयुक्तांना पाठविला आहे. तर, ४ लाख ९६ हजार ५४५ शेतकऱ्यांना अजून ओळख क्रमांक देण्यात आलेला नाही. त्यातील अजून ८४ हजार १३० शेतकऱ्यांना हा ओळख क्रमांक देण्यात येणार असून, ४ लाख १२ हजार ४१५ शेतकऱ्यांना हा क्रमांक देता येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जमाबंदी आयुक्तांना दिलेल्या अहवालात पाच गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेले, परगावी राहणारे, नव्याने वारस नोंद झालेले, सरकारी कंपनी- संंस्था असलेले खातेदार यांची पडताळणी करून ग्राम महसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार सुमारे चार लाख २१ हजार ४१५ अर्थात ४० टक्के जणांनी यात नोंदणी केलेली नाही किंवा करणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६ लाखच असणार आहे.

आतापर्यंत ५ लाख ४२ हजार ५५६ शेतकऱ्यांनाच ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक देण्यात आला असून, अजून ८४ हजार १३० शेतकऱ्यांना तो देता येईल, असा अहवाल जमाबंदी आयुक्तांना पाठविला आहे.  - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, कुळकायदा 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र