पाटबंधारे विभागाने पर्याय न देता कोल्हापूर पद्धतीचा पूल तोडला; तीन गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:17 IST2026-01-09T12:17:05+5:302026-01-09T12:17:47+5:30

- पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यात समन्वय दिसून आला नाही

pune news the Irrigation Department demolished the Kolhapur-style bridge without giving any alternative; Three villages lost connectivity | पाटबंधारे विभागाने पर्याय न देता कोल्हापूर पद्धतीचा पूल तोडला; तीन गावांचा संपर्क तुटला

पाटबंधारे विभागाने पर्याय न देता कोल्हापूर पद्धतीचा पूल तोडला; तीन गावांचा संपर्क तुटला

कोळवण:  कोळवण–वाळेण–डोंगरगाव या गावांना जोडणारा पाटबंधारे विभागाने सुमारे चाळीस वर्षांपूर्वी उभारलेला कोल्हापूर पद्धतीचा पूल गुरुवारी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता तोडण्यात आला. त्यामुळे कोळवणपासून पुढे डोंगरगाव गावठाण व वाळेण या गावांचा रस्ते संपर्क पूर्णतः तुटला असून शालेय विद्यार्थी, शेतकरी, दुग्धव्यवसायिक व शेतमाल वाहतूक करणाऱ्यांचे मोठे हाल सुरू झाले आहेत.

पुल तोडल्यामुळे कोळवण विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेत ये–जा करण्यासाठी शेजारी असलेल्या छोट्या पाणी साठवण बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने उड्या मारत नदी पार करावी लागत आहे. येथे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून केला जात आहे.

पाटबंधारे विभागाने पूल तोडण्यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते; मात्र विभागांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आल्याने कोणतीही पूर्वतयारी करण्यात आली नाही. सध्या उपलब्ध असलेला पर्यायी खासगी रस्ता मातीचा असून त्यावरून वाहतूक करणे अवघड आहे. शिवाय या मार्गाने अंतर सुमारे चार किलोमीटरने वाढत असल्याने नागरिकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी तातडीने नवीन पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

कायमस्वरूपी उपाययोजना करा

पूल तोडल्याने कोळवण, डोंगरगाव व वाळेणचा संपर्क तुटला असून प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. 

"कोल्हापूर पद्धतीचा हा बंधारा होता त्याचा वापर रहदारी साठी होत होता परंतु हा बंधारा धोकादायक स्थितीत होता व तो कधीही कोसळेल अशी स्थिती होती जुलै महिन्यातच हा बंधारा पाडावा असे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यामुळे सुमारे पाच महिन्यांच्या विलंबाने या बंधार्याचा वरचा स्लॅब तोडला आहे." - सुरेश कोंढरे, कर्मचारी पाटबंधारे विभाग 

"वाळेण रस्त्यावरील पूल तोडल्याने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यासाठी मी आज शुक्रवार रोजी समक्ष कोळवण येथे भेट देऊन पाहणी करण्यासाठी जाणार आहे."  - विजयकुमार चोबे, तहसीलदार मुळशी

"कोळवण वाळेण रस्त्यावरील पूल तोडल्याने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मोऱ्या आणल्या आहेत. एवढ्या दोन दिवसांत येथून पर्यायी रस्त्याची व्यवस्था सर्वांचे सहकार्याने करणार आहे. नवीन पूल बांधकाम लवकर पावसाळ्याच्या अगोदर करावे."  - संजय साठे, माजी सरपंच, वाळे

Web Title : विकल्प के बिना कोल्हापुर शैली का पुल तोड़ा, तीन गांवों का संपर्क टूटा।

Web Summary : सिंचाई विभाग द्वारा कोल्हापुर शैली के पुल को अचानक तोड़े जाने से कोलवन से डोंगरगांव और वालेन का सड़क संपर्क कट गया है। वैकल्पिक मार्गों की कमी के कारण स्कूली बच्चों और किसानों को कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है, जिससे मानसून से पहले तत्काल कार्रवाई और एक नए पुल के निर्माण की मांग हो रही है।

Web Title : Kolhapur-style bridge demolished without alternative, disrupting connectivity of three villages.

Web Summary : The sudden demolition of a Kolhapur-style bridge by the irrigation department has severed road access to Dongargaon and Walen from Kolwan. School children and farmers face hardship due to the lack of alternative routes, prompting calls for immediate action and construction of a new bridge before the monsoon season.