बारामतीत भीषण अपघात: वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:59 IST2025-07-27T14:58:20+5:302025-07-27T14:59:03+5:30
सणसर गावासह संपूर्ण बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बारामतीत भीषण अपघात: वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू
बारामती : मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात रविवारी (२७ जुलै २०२५) सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातानेबारामती शहर हादरले. डंपर आणि दुचाकीच्या धडकेत एका कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी (MH 16 CA 0212) डंपरच्या चाकाखाली सापडल्याने वडिलांसह त्यांच्या दोन मुली चिरडल्या गेल्या.
खंडोबा नगर परिसरातील या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या अपघातात ओंकार आचार्य (मूळ रा. सणसर, ता. इंदापूर, सध्या रा. मोरगाव रोड, बारामती) यांच्यासह त्यांच्या दोन मुली सई (वय १० वर्षे) आणि मधुरा (वय ४ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सई आणि मधुरा यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेने सणसर गावासह संपूर्ण बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.