शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
3
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
4
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
5
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
6
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
7
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
8
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
9
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
10
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
11
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
12
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
13
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
14
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
15
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
16
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
17
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
18
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
19
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
20
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक रस्त्यावर, मराठी शाळा वाचविण्यासाठी राज्यात गुरुवारी शिक्षकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:28 IST

- संच मान्यतेमुळे शिक्षकांची पदे कमी करणे, सक्तीने सेवानिवृत्तीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन

पुणे/ मंचर : नवीन संचमान्यतेमुळे हजारो शाळांवरील शिक्षकांची पदे कमी करणे, दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती, तसेच ऑनलाइन अशैक्षणिक कामांचे वाढते ओझे यामुळे संतापलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव शुक्रवारी (दि. ५) जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत. या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आंबेगाव तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली. काही काळापासून नवीन संचमान्यतेमुळे राज्यभरातील २० हजारांहून अधिक शिक्षकांची पदे कमी होणार आहेत. त्यातच १ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी

परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला. शिवाय शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाकडून सोडवणूक नाही मिळाल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून एकत्र येऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आक्रोश मोर्चे आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार पुणे येथील नवीन जिल्हा परिषद कार्यालयापासून शुक्रवारी सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू होईल. तो विभागीय आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालय या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आक्रोश महामोर्चाच्या स्वरूपात संपेल.या मोर्चामध्ये प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक भारती व केंद्रप्रमुख संघटना, महानगरपालिका, नगरपालिका शिक्षक संघ, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक सेना तसेच राज्यभरातील प्रमुख संघटना सहभागी होतील. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रमुख संघटनांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती तयार केली आहे.समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभर ५ डिसेंबर रोजी शाळा बंद करण्याचे तसेच जिल्हास्तरावर मोर्चाचे आवाहन करण्यात आले असून आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळकंदे, एकल संघटनेचे अध्यक्ष संतोष गवारी आणि जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष विनोद ढोबळे यांनी हे आवाहन केले आहे.

ऑनलाइन शैक्षणिक कामांचा भडिमारप्रचंड ऑनलाइन शैक्षणिक कामांचा भडिमार, संचमान्यतेमुळे शिक्षक कपातीचे धोरण आणि टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याने शिक्षकांवर वाढलेला तणाव यामुळे मराठी शाळा वाचवण्यासाठी संघटनेने ५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.त्यामुळे शिक्षकांनी या मोर्चात 3 मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी केले आहे.प्राथमिक व माध्यमिक 3 स्तरावरील २८२ शाळांमधील ११५० शिक्षक या दिवशी रजेवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teachers Protest to Save Marathi Schools Amid Job, TET Concerns

Web Summary : Teachers across Maharashtra will protest on Friday, December 5th, against job cuts due to new staff approval norms, mandatory TET exams, and excessive online work. The protest aims to save Marathi schools and address pending teacher issues with the government. Schools will be closed in Pune district.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेElectionनिवडणूक 2024