शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मी जमीन खरेदी केलेली नाही; माझे नाव कोणत्याही कागदपत्रात नाही - अभिनेत्री सोनाली बेंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:50 IST

सोनाली म्हणते, मावळमधील जमीन खरेदी केलेलीच नाही.. !मौजे-उकसान येथील जमीन खरेदी प्रकरण; पैसे उकळण्याचा आरोप

पुणे : मावळ जिल्ह्यातील मौजे-उकसान येथील सर्व्हे नं. १२१/१, क्षेत्र - ३० गुंठे या शेतजमिनीबाबत वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तिचे पती गोल्डी रमेश बेहल व अन्य दोन व्यक्तींविरोधात चंद्रकांत बाळू शिंदे या मावळ तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्याने दावा दाखल केला आहे.

यात चंद्रकांत बाळू शिंदे यांची वडिलोपार्जित कुळ हक्काची शेतजमीन नियमबाह्य पद्धतीने व कुळाचा हक्क डावलून सोनाली बेंद्रे यांचे पती गोल्डी रमेश बेहल यांनी परस्पर विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या दाव्यातील आरोप अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी नाकारले आहेत. मी संबंधित जमीन खरेदी केलेली नसून, माझे नाव कोणत्याही कागदपत्रात नाही. केवळ पैसे उकळण्याच्या हेतूने हा सर्व खोटा प्रकार रचण्यात आलेला आहे, असा प्रत्यारोप सोनाली बेंद्रे यांनी केला आहे.

सोनाली बेंद्रे यांचे वकील ॲड. राजू शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ जून १९६५ रोजी तहसीलदार मावळ यांनी केसू बाबाजी शिंदे हा मालक नाही” असा स्पष्ट निकाल दिलेला आहे. त्यानंतर चंद्रकांत शिंदे यांनी तहसीलदार वडगाव मावळ यांच्याकडे अपील दाखल केले होते; परंतु ते अपील दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी नामंजूर करण्यात आले . यानंतर त्यांनी प्रकरण क्र. १४२/२०२२ अंतर्गत उपविभागीय अधिकारी (एसडीओ) मावळ यांच्याकडे अपील दाखल केले, तेही नामंजूर झाले.

त्यानंतर पुन्हा तहसीलदार वडगाव मावळ यांच्याकडे अपील दाखल केले, ते दि. ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी नामंजूर करण्यात आले, तसेच पुन्हा उपविभागीय अधिकारी मावळ यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. वरील सर्व बाबींवरून संबंधित व्यक्ती वारंवार खोटे व निराधार अर्ज करून शासकीय कार्यालयांचा वेळ वाया घालवत आहे व केवळ आर्थिक लाभ (पैसे उकळणे) मिळवण्याच्या हेतूने हे सर्व प्रकार सुरू आहेत, असे स्पष्ट होते, तसेच कामशेत पोलिस स्टेशन येथेही वारंवार खोट्या व बनावट तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. संबंधित जमीन खरेदी करताना त्या जमिनीत सोनाली बेंद्रे यांचे नाव कोणत्याही कागदपत्रात नाही. केवळ पैसे उकळण्याच्या हेतूने हा सर्व खोटा प्रकार रचण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonali Bendre Denies Land Purchase, Alleges Extortion Attempt

Web Summary : Sonali Bendre denies purchasing land in Maval, Pune, refuting claims by a local farmer. She alleges an extortion attempt, stating her name isn't on any property documents. Her lawyer highlights prior dismissed appeals by the farmer, suggesting harassment and baseless accusations for financial gain.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSonali Bendreसोनाली बेंद्रेPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र