पुणे - महिला दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘मिनी सरस सावित्री जत्रा’ कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली, तसेच पार्थ पवार यांच्या राज्यसभेवरील निवडीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, या अपघाताची चौकशी सध्या विविध यंत्रणांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला तरी संपूर्ण आणि अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता आला आहे. मात्र संपूर्ण अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे अंतिम अहवाल आल्यानंतरच या विषयावर अधिक सविस्तर बोलता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पार्थ पवार यांच्या राज्यसभेवरील निवडीबाबतही सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पार्थ पवारांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, राज्यसभा हे देशातील वरिष्ठ आणि अनुभवी सदस्यांचे सभागृह आहे. राज्यसभा हे उच्च आणि अनुभवी लोकांचे सभागृह आहे. त्यामुळे तिथे काम करताना सर्वप्रथम सभागृहाची कार्यपद्धती, नियम आणि परंपरा समजून घेणे महत्त्वाचे असते. पार्थ पवार हे या सर्व गोष्टी शिकून घेतील आणि नक्कीच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
Web Summary : Sunetra Pawar addressed Ajit Pawar's plane accident investigation, awaiting the final report. She also commented on Parth Pawar's Rajya Sabha selection, emphasizing learning procedures for effective performance.
Web Summary : सुनेत्रा पवार ने अजित पवार के विमान दुर्घटना की जांच पर बात की, अंतिम रिपोर्ट का इंतजार है। पार्थ पवार के राज्यसभा चयन पर भी टिप्पणी की, प्रभावी प्रदर्शन के लिए प्रक्रियाओं को सीखने पर जोर दिया।