शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीतून सात टीएमसी पाणी देण्यास राज्य सरकार, टाटाची तत्त्वतः मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 10:03 IST

- पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आवश्यक असलेले अतिरिक्त पाणी खडकवासला प्रकल्पातून अपुरे पडत

पुणे : पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जलसंपदा विभागाने मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी घेण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तसेच टाटा कंपनीने तत्त्वतः मान्यता दिली आहे. हे पाणी नेमके कसे, कधी व कोठे वापरावे यासंदर्भात जलसंपदा विभागासह टाटा कंपनीचा तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा एक संयुक्त गट अभ्यास करणार आहे. पुढील बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. त्यात तांत्रिक मान्यतेबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आवश्यक असलेले अतिरिक्त पाणी खडकवासला प्रकल्पातून अपुरे पडत आहे. त्यासाठी मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगर सिंचनासाठी वापरता येईल, असा पर्याय पुढे आला होता. त्यानुसार मुळशी धरणातून वाया जाणाऱ्या सुमारे सात टीएमसी पाण्याच्या वापरास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीला आमदार राहुल कुल उपस्थित होते.

तत्त्वतः मान्यता

या बैठकीत विखे यांनी सकारात्मक भूमिका घेत या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. तसेच टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शविली असून, हे पाणी नेमके कधी कसे व कोठे वापरायचे यासंदर्भात अभ्यास गट स्थापन करावा, अशा सूचना विखे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार टाटा कंपनी आणि जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा एक अभ्यास गट तयार करण्यात आला असून, यासंदर्भात शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करण्यात येत आहे. विखे पाटील यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यात त्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात येणार आहे. टाटा कंपनी व राज्य सरकारने दिलेल्या मान्यतेनंतर मुळशी धरणातून पुणे शहराला सात टीएमसी पाणी मिळणार यावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानंतर मिळणाऱ्या तांत्रिक मान्यतेनुसार हा प्रकल्प पुढे जाईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

असे मिळेल पाणी

मुळशी धरणावरून टाटा हायड्रो पावर कंपनीमार्फत भीरा जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी वापरले जाते. प्रकल्पाचा एकूण जिवंत पाणीसाठा १८.४७ टीएमसी इतका आहे. तर मृत साठा ८.१२ टीएमसी इतका आहे. या पाण्यातून तीनशे मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी सहा संच वापरण्यात येत आहेत. मुळशी प्रकल्पाच्या भीरा जलविद्युत केंद्रातील २४ टीएमसी वार्षिक पाणीवापरापैकी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत उपलब्ध होणाऱ्या १७ टीएमसी पाण्याद्वारे जास्तीतजास्त वीजनिर्मिती करून उर्वरित सात टीएमसी पाणी वापर १५ ऑक्टोबरनंतरच्या १८.५० टीएमसी पाणीसाठ्यातून आठ महिन्यांमध्ये वीजनिर्मितीसाठी करता येणार आहे. तर १.६५ टीएमसी बोगदा प्रकल्पासाठी व उर्वरित ९.८५ टीएमसीपैकी बाष्पीभवन वजा जाता शिल्लक सात टीएमसी पाणी पूर्वेकडे अर्थात शहरासाठी वळवता येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र