पुणे : भरधाव मोटारीने सहा वाहनांना धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री हडपसरमधील हांडेवाडी परिसरात घडली. अपघातात तिघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मोटार चालक प्रशांत रमेश पाटील (४५, रा.ससाणेनगर, हडपसर) याला काळेपडळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार चालक पाटील सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भरधाव वेगात हडपसरमधील हांडेवाडी परिसरातून जात होता. श्रीराम चौकात मोटार चालक पाटील याचे नियंत्रण सुटले आणि एकापाठोपाठ एक अशा सहा वाहनांना धडक दिली.
या अपघातात दुचाकी आणि मोटारीचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच, काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मोटार चालक पाटील याला ताब्यात घेतले. अपघातात जखमी झालेल्या तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोटार चालक पाटील याच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर काही काळ श्रीराम चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
Web Summary : A speeding car collided with six vehicles in Handewadi, Pune, injuring three. Police arrested the driver, Prashant Patil, after the accident disrupted traffic. The injured are receiving treatment.
Web Summary : पुणे के हंडेवाड़ी में एक तेज रफ्तार कार ने छह वाहनों को टक्कर मार दी, जिससे तीन लोग घायल हो गए। पुलिस ने चालक प्रशांत पाटिल को गिरफ्तार कर लिया, दुर्घटना से यातायात बाधित हो गया। घायलों का इलाज चल रहा है।