पुण्याचा 'पुष्पा'..! खासगी कंपनीतील रखवालदाराला धमकावून चंदनाच्या झाडाच्या चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:44 IST2026-01-27T17:42:52+5:302026-01-27T17:44:21+5:30
चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याचा 'पुष्पा'..! खासगी कंपनीतील रखवालदाराला धमकावून चंदनाच्या झाडाच्या चोरी
पुणे : शहर परिसरातील बंगले, सोसायटीचे आवार, शासकीय आणि शैक्षणिक संस्थेच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशाचप्रकारे खडकीतील एका खासगी कंपनीत शिरून रखवालदाराला धमकावत चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रखवालदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीत किर्लोस्कर इंडस्ट्रीज कंपनी आहे. कंपनीच्या आवारात मध्यरात्री तीन ते चार चोर शिरले.
गस्त घालणाऱ्या रखवालदाराने चोरट्यांना पाहिले. त्यांनी चोरट्यांना हटकले. तेव्हा चोरट्यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन चंदनाचे झाड कापून नेले. पोलिस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत.