दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:09 IST2025-11-14T19:07:50+5:302025-11-14T19:09:00+5:30
शासन निर्णयानुसार कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना, संख्या दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणीशिवाय कार्य करू शकत नाही

दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार दिव्यांगांच्या कल्याण पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटना, संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले असल्याचे जिल्हास्तरीय दिव्यांग समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.
शासन निर्णयानुसार कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना, संख्या दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणीशिवाय कार्य करू शकत नाही. जिल्ह्यातील ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करायचे आहे, त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे, असेही डुडी यांनी कळविले आहे.
नोंदणी नसलेल्या संस्था, व्यक्ती दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आल्यास संबंधिताविरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार व इतर कायद्यानुसार कारवाईस पात्र असतील. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा.