शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 09:58 IST

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत एकप्रकारे आव्हान दिले

- हिरा सरवदेपुणे : कॉंग्रेसचा त्याग करून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत एकप्रकारे आव्हान दिले जात आहे. यामुळे धंगेकर यांनी पक्षांतर केले असले तरी त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत असलेले जुने वाद आणि मतभेद मिटण्याऐवजी ते तिव्र होत असल्याचे चित्र आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात युतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत रवींद्र धंगेकर यांनी राज्यकर्त्यांना चांगलाच दणका दिला होता. या विजयामुळे धंगेकर यांची संपूर्ण राज्यात ओळख आणि क्रेझ निर्माण केली होती. त्यानंतर कॉंग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. पुन्हा त्यांना विधानसभेला संधी दिली. या निवडणुकीत हेमंत रासने यांनी पोटनिवडणुकीतील पराभवाची परतफेड करत धंगेकर यांचा पराभव केला.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याने महायुतीचे अनेक नेते महायुतीच्या जवळ गेले. त्यामध्ये धंगेकर यांनी कॉंग्रेसला रामराम करत शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. धंगेकर यांचे पक्षांत झाल्याने त्यांचे व महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांशी असलेले मतभेद व वाद मिटतील का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता त्याची प्रचिती येत आहे.

धंगेकर यांचे पक्षांतर झाल्यानंतरही भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षातील नेत्यांसोबत असलेले मतभेद तीव्र होत आहेत. भाजपच्या नेत्यांनी पूर्वीचे वाद मिटणार नाहीत, असे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी जाहीरपणे धंगेकर यांच्यावर टीका करत, जुने वाद मिटणार नसल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्यासमोर जनतेच्या मनातील आमदार असे होर्डिंग लावले होते. त्यानंतर आता धंगेकर यांच्या नावाने कसबा मतदारसंघात फ्लेक्स झळकत आहेत. धंगेकर यांच्याकडून विद्यमान आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले जात आहे. 

फ्लेक्सवर काय?  

कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर...

माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असं आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र, घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडravindra dhangekarरविंद्र धंगेकरBJPभाजपाkasba-peth-acकसबा पेठMahayutiमहायुती