राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दराची १ डिसेंबरपासून अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:40 IST2025-11-16T15:39:36+5:302025-11-16T15:40:09+5:30
सात वर्षांनंतर प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ डिसेंबर २०२५ पासून केली जाणार

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दराची १ डिसेंबरपासून अंमलबजावणी
पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे तिकीट दर वाढविण्याच्या प्रस्तावास महापालिकेच्या स्थायी समितीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सात वर्षांनंतर प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ डिसेंबर २०२५ पासून केली जाणार आहे.
महापालिकेकडून प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचे काम सुरू असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. या विस्तारीकरणानंतर झेब्रा, पिसोरी हरीण, लायन टेल्ड मकाक या नव्या प्रजातींसाठी प्रदर्शने उभारली जात आहेत.
याशिवाय प्राण्यांच्या आहारासाठी, सेवकांचे वेतन, खंदक देखभाल-दुरुस्ती आणि मास्टर प्लॅननुसार विकास प्रकल्पांसाठी मोठा खर्च होत आहे. त्यामुळे तिकीट दरात वाढ केली आहे. लहान मुलांचे तिकीट १० रुपयांवरून २० रुपये केले आहे. प्रौढांचे तिकीट ४० रुपयांवरून ६० रुपये केले आहे, तर विदेशी नागरिकांचे तिकीट १०० वरून १५० रुपये केले आहे. पालिकेच्या शाळा, जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांचे तिकीट ५ वरून १० रुपये करण्यात आले आहे.