शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर हादरले..! रिक्षा–बुलेट अपघातात पोलीस अंमलदाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:07 IST

या भीषण धडकेत होले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रस्त्यावर कोसळले.

पुणे - राजगुरुनगर (ता. खेड) येथे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदाराचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना पाबळ रोडवरील चव्हाण मळा, टाकळकरवाडी फाटा परिसरात घडली. मृत पोलीस अंमलदाराचे नाव शशिकांत श्रीधर होले (वय ३७, रा. होलेवाडी, ता. खेड) असे असून ते महालुंगे पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २८) रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास शशिकांत होले हे बुलेट मोटारसायकलवरून आपल्या होलेवाडी येथील घरी जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या रिक्षाने अचानक वळण घेतल्याने बुलेट आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत होले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रस्त्यावर कोसळले.त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शशिकांत होले हे धाडसी व कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांचे बंधू श्रीकांत होले हेही पोलीस दलात कार्यरत आहेत. राजगुरुनगर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने होलेवाडीसह संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajgurunagar shaken: Police officer dies in rickshaw-bullet collision.

Web Summary : A dedicated police officer, Shashikant Hole, died in a tragic accident near Rajgurunagar. His motorcycle collided with a rickshaw, causing fatal head injuries. Hole, known for his bravery and dedication, was 37 and leaves behind his wife and two children. The incident has cast a pall of gloom over the region.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात