शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

प्री-स्कूल, डे-केअर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, सीसीटीव्हीही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 14:58 IST

- मुलांच्या देखरेखीत निष्काळजीपणाचा पालकांचा आरोप, जिथे सीसीटीव्ही आहेत त्याचा अॅक्सेस पालकांना नाही, संस्थाचालकांकडून आरोपाचे खंडन

पुणे : प्री-स्कूल आणि डे-केअरमध्ये तुमची मुलं खरंच सुरक्षित आहेत का? त्यांची काळजी घेतली जाते का? सुरक्षिततेची हमी देणाऱ्या अनेक केंद्रांवर पालकांचा विश्वास असतो; परंतु पुण्यातील एका डे-केअरमध्ये मुलांकडे निष्काळजीपणे वागणूक दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर हा सवाल पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वतःला ‘सुरक्षित आणि विश्वासार्ह’ असे सांगणाऱ्या या स्कूल स्वच्छतेचा अभाव, अपुऱ्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची देखभाल आणि जेवण देण्याची अयोग्य पद्धती वापरल्याचे आरोप करुणा गंगावणे यांच्यासह पालकांनी केली आहेत.

या पार्श्वभूमीवर संबधित प्री-स्कूलला संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. प्री-स्कूल व डे-केअर लहान मुलांच्या सुरक्षेची काळजी योग्य पद्धतीने घेतली जात नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहणाऱ्या पालकांसाठी डे-केअर ही मोठी सोय मानली जाते. मात्र इथेच सुरक्षा, स्वच्छता आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती मुलांच्या आरोग्याला व मानसिक विकासाला गंभीर धोका निर्माण करत असल्याचे उघड झाले आहे.

करुणा गंगावणे यांनी सांगितले, की खेसे पार्क येथील प्री-स्कूल डे-केअरमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरण होते. केंद्रात फक्त एकच मावशी दहा मुलांची जबाबदारी सांभाळत असल्याने मुलांकडे योग्य लक्ष दिले जात नव्हते. जेवण देताना एकाच चमच्याने सर्वांना खाऊ घालणे, खेळताना भांडण करणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार नियमितपणे दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक मुलांना ‘तोंडाचे विकार’ झाल्याचेही सांगण्यात आले.

तक्रारीनंतरही संस्थेचा नकार

पालकांनी या तक्रारीची चौकशीची मागणी केली असता संस्थाचालकांनी ‘असा प्रकार घडलेलाच नाही’ असा दावा करत पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकारामुळे डे-केअरमध्ये कुठल्याही प्रकारचे सुरक्षा निकष पाळले जात नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

नोंदणी नसलेली केंद्रे व तपासणीचा अभाव

शहरात मोठ्या प्रमाणावर नोंदणी नसलेली प्री-स्कूल व डे-केअर संस्था चालवली जात आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून कोणतीही नियमित तपासणी न होत असल्याने अनेक संस्था मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. नियमांचे पालन करणाऱ्या संस्थांचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत.

कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता व पडताळणीच नाही

अनेक डे-केअरमध्ये शिक्षक व मावशींची शैक्षणिक पात्रता, पोलिस पडताळणी, मानसिक तयारी किंवा बाल संगोपनाबाबतचे कोणतेही प्रशिक्षण तपासले जात नाही. बाल संगोपनाचे ज्ञान व अनुभव नसलेल्या व्यक्तींकडे लहान मुलांची जबाबदारी सोपवली जात असल्याने पालकांमध्ये असुरक्षितता वाढत आहे.

स्वच्छतेचा अभाव आजारांचा धोका वाढतो

शौचालय, वर्गखोल्या, खेळणी आणि जेवणाची भांडी स्वच्छ नसल्याने मुलांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. सामूहिक चमच्याचा वापर, अस्वच्छ पद्धतीने खाऊ देणे ही पद्धत मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. 

नियम न पाळल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता

या सर्व प्रकारांतून स्पष्ट होते की प्री-स्कूल व डे-केअरच्या नोंदणी आणि निरीक्षण प्रक्रियेत मोठ्या उणिवा आहेत. पालकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे थांबवून प्रशासनाने तातडीने व्यापक तपासणी मोहीम राबवणे गरजेचे आहे. अपात्र व अवैध संस्थांवर कठोर कारवाई न झाल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कायम राहणार आहे.

लहान मुलांची सुरक्षितता ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. ती पार पाडण्यात अपयशी ठरणाऱ्या डे-केअरवर नियंत्रण आणि कडक नियमावली लागू करण्यासाठी प्रशासन कोणाची वाट पाहात आहे असा सवाल पुणेकरांनी उपस्थिती केला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 घरातील सर्व जण कामावर जात असल्याने आमच्या १९ महिन्यांच्या बाळाला डे-केअरमध्ये ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. ही प्री-स्कूलचे वातावरण अस्वच्छ असल्यामुळे आमच्या बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. मुलांची देखभाल करणाऱ्या मावशींच्या हाताला फंगल इन्फेक्शन होते. त्याच हातांनी आणि एकाच चमच्याने ते मुलांना जेवण देत होते. यामुळे आमच्या बाळाला माऊथ डिसीज झाला. ही तक्रार संस्था चालकांकडे केली असता त्यांनी सर्व गोष्टी नाकारल्या. त्यानंतर आमचे बाळ आजारी पडले आणि त्याच्या मनात प्री-स्कूलबद्दल भीती निर्माण झाली आहे. अशा निष्काळजीपणाने चालणाऱ्या डे-केअर आणि प्री-स्कूलवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. - करुणा गंगावणे, पालक लहान मुलांचे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षितता ही कोणत्याही प्री-स्कूलची सर्वात मोठी जबाबदारी आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता, शुद्ध पाण्याची उपलब्धता, औषधपेटी, तसेच विद्यार्थ्यांचा वैद्यकीय इतिहास (मेडिकल हिस्ट्री) या मूलभूत गरजा प्रत्येक बालवाडीत काटेकोरपणे पाळल्या गेल्याच पाहिजेत. आजारी मुलांना शाळेत न पाठवणे ही पालकांचीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. नियम पाळण्यात कसूर करणाऱ्या संस्थांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.  – दिलीपसिंग विश्वकर्मा, महापेरेंट्स पालक संघटना 

English
हिंदी सारांश
Web Title : Safety concerns raised over Pune's pre-schools and daycares.

Web Summary : Pune pre-schools and daycares face scrutiny over safety and hygiene. Negligence, lack of trained staff, and unhygienic practices endanger children. Authorities urged to conduct inspections and enforce stricter regulations to protect young children.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे