Pune News : सोमवारी पुणे ग्रँड टुर; एफसी-जेएम रोडवर ९ तास वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 16:04 IST2026-01-18T16:01:43+5:302026-01-18T16:04:30+5:30

- महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना देखील सुटी

Pune News Pune Grand Tour on Monday; Traffic closed for 9 hours on FC-JM Road | Pune News : सोमवारी पुणे ग्रँड टुर; एफसी-जेएम रोडवर ९ तास वाहतूक बंद

Pune News : सोमवारी पुणे ग्रँड टुर; एफसी-जेएम रोडवर ९ तास वाहतूक बंद

पुणे : जिल्हा प्रशासनासह सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शहरात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या सायकलिंग स्पर्धेचे १९ ते २४ जानेवारी दरम्यान आयोजन केले आहे. सोमवारी (दि. १९) या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, यानिमित्त फर्ग्युसन कॉलेज रोड (एफसी रोड) आणि जंगली महाराज रोड (जेएम रोड) सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच या रस्त्यांना जोडणारे उपरस्ते देखील बंद राहणार असल्याची माहिती पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली. यावेळी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतुक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांची उपस्थिती होती.

पुणे ग्रँड टुर २०२६ सायकल स्पर्धेसाठी ४० देशांतील १७१ सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. त्यानिमित्त शासन स्तरावरील सर्व तयारी पूर्ण झाली असून, देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचा मोठा इव्हेंट पार पडणार आहे. ४० देशांमध्ये या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण होणार असून, शहराच्या नावलौकीकात आणखी भर पाडणारा हा इव्हेंट असेल, असे मत सहपोलिस आयुक्त शर्मा यांनी व्यक्त केले. सोमवारी या स्पर्धेनिमित्त शहराच्या मध्यवर्ती व पश्चिम भागातील शैक्षणिक संस्था देखील बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---

या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालये राहणार बंद...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एफसी रोड, गणेशखिंड रोड आणि जेएम रोडसह त्यांना जोडणारे उपरस्ते देखील वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालये पूर्णवेळ बंद राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश शनिवारी दिले. यामध्ये छत्रपती शिवाजीनगर घोले रोड, विश्रामबाग वाडा कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध बाणेर, कोथरूड बावधन, सिंहगड रोड आणि वारजे कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे.

---

असा असेल पोलिस बंदोबस्त..

सोमवारी पार पडणाऱ्या पुणे ग्रँड टुरसाठी ३ अपर पोलिस आयुक्त, १० पोलिस उपायुक्त, १५ सहायक पोलिस आयुक्त, ५० पोलिस निरीक्षक, २०० सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, १६०० पोलिस कर्मचारी यांच्यासह बाँम्ब शोधक व नाशक पथक आणि शीघ्र कृती दल (क्युआरटी) ची पथके असा पोलिस बंदोबस्त राहणार आहे.

---

बंद रस्ते व पर्यायी मार्ग...

१) खंडोजी बाबा चौक ते गरवारे ब्रीज ते गुडलक चौक

पर्यायी मार्ग : १) स्वारगेट कडुन पुणे विद्यापीठकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी -खंडोजीबाबा चौक अलका चौक व स.गो. बर्वे चौकाकडे न जाता आण्णा भाऊ साठे चौक - ना. सी. फडके चौक मांगीरबाबा चौक - सेनादत्त चौक - बालशिवाजी - म्हात्रे पूल मार्गे जावे

२) स्वारगेट कडून खडकी / जुना पुणे मुंबई हायवे कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आण्णा भाऊ साठे चौक - पुरम चौक - बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा - कुंभार वेस - आरटीओ चौक मार्गे

---------------------

अ) खंडोजी बाबा चौकात येणारे वाहने:

१) नळस्टॉप - पौड फाटा, आठवले चौक लॉ कॉलेज रोड मार्गे जावे

२) अलका टॉकीज चौक - केळकर रस्ता - नदी पात्र - शनिवार वाडा - गाडगीळ पुतळा मार्गे

३) सेनादत्त चौक बालशिवाजी म्हात्रे पूल मार्गे

४) शामराव गांजवे चौक - पत्रकार भवन - एस. एम. जोशी पूल - गरवारे कॉलेज मार्गे

५) सेवासदन चौक - आप्पा बळवंत चौक वाडा - गाडगीळ पुतळा कुंभार वेस चौक मार्गे शनिवार आरटीओ

------------------------------

२) गुडलक चौक ते तुकाराम पादुका चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक ते ललित महल चौक चे चाफेकर चौक :

पर्यायी मार्ग : १) शेलार मामा चौक प्रभात रोड लॉ कॉलेज रोड एस.बी. रोड विद्यापीठ चौक मार्गे २) भांडारकर रोड, बी.एम.सी.सी. रोड, चतुः श्रृंगी रोड, मॉडेल कॉलनी रोड वरून फर्ग्युसन कॉलेज रोडवर न येता लॉ कॉलेज रोड व सेनापती बापट रोड मार्गे जावे

-----------------------------------

३) चाफेकर चौक ते सूर्यमुखी चौक दत्त मंदिर चौक ते रंज हिल्स कॉर्नर येथे यु टर्न :

पर्यायी मार्ग : ब) विद्यापीठ चौकात येणारी जाणारी वाहने

१) एस.बी. रोड जंक्शन - विद्यापीठ चौक - ब्रेमन चौक - स्पायसर कॉलेज मार्गे

२) भोसलेनगर - सिंफनी सर्कल मार्गे

३) औंध रोड - ब्रेमन चौक - स्पायसर कॉलेज मार्गे

४) नगरगिस दत्त, कॉसमॉस, हरेकृष्ण मंदिर रोड, धोत्रे रोड, गोखले रोड वरून गणेशखिंड रोडवर न येता सेनापती बापट रोड मार्गे जावे

---------------------------------------

४) रेंज हिल्स चौक ते सुर्यमुखी दत्त मंदिर चौक ते चाफेकर चौक ते सिमला ऑफिस चौक ते संचेती चौक :

पर्यायी मार्ग : १) विद्यापीठ चौक - एस.बी. जंक्शन - वि. स. खांडेकर चौक नळस्टॉप मार्गे

२) विद्यापीठ चौक - रेंज हिल्स कॉर्नर - सिफंनी सर्कल मार्गे जावे (एकेरी वाहतुक राहील)

सिंफनी सर्कल येथून रेंज हिल्स कडे जाण्यास बंदी करण्यात येत आहे.

३) न.ता.वाडी रोड, सिमला ऑफिस चौक, यांनी वाकडेवाडी अंडर पास मार्गे जावे

----------------------------------

५) संचेती चौक ते स.गो.बर्वे चौक ते बालगंधर्व चौक ते डेक्कन जिमखाना बस डेपो :

पर्यायी मार्ग : क) सादलबाबा चौकात येणारी - जाणारी वाहने

१) सादलबाबा चौक - पर्णकुटी चौक - केपी जंक्शन - मोबाज चौक - आरटीओ चौक शाहीर अमर चौक मार्गे जावे

२) खडकी - पोल्ट्री चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - ब्रेमन चौक मार्गे जावे.

३) वाकडेवाडी - पाटील इस्टेट - वाकडेवाडी पोल्ट्री चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक -ब्रेमन चौक मार्गे जावे.

४) न.ता.वाडी - वाकडेवाडी - पाटील इस्टेट - आरटीओ चौक शाहीर अमर चौक मार्गे जावे

ड) शनिवार वाडा - गाडगीळ पुतळा - कुंभारवाडा - शाहीर अमर मार्गे जावे.

 

Web Title : पुणे ग्रैंड टूर: एफसी, जेएम रोड पर 9 घंटे यातायात बंद।

Web Summary : पुणे में 19-24 जनवरी को ग्रैंड साइकिलिंग टूर। सोमवार को उद्घाटन के कारण एफसी, जेएम रोड सुबह 9 बजे से शाम 6 बजे तक बंद। प्रभावित क्षेत्रों में स्कूल बंद। वैकल्पिक मार्गों की सलाह।

Web Title : Pune Grand Tour: Traffic closure on FC, JM Road for 9 hours.

Web Summary : Pune hosts Grand Cycling Tour Jan 19-24. Inauguration on Monday closes FC, JM Road 9 AM-6 PM. Schools in affected areas shut. Alternative routes advised.