येरवडा ते कात्रज बोगद्याचा प्रकल्प आराखडा तयार, पण निधी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:01 IST2026-03-07T12:00:18+5:302026-03-07T12:01:51+5:30

- पीएमआरडीएने कात्रज ते येरवडा असा बोगदा करण्याचा प्रस्ताव मांडला.

pune news project plan for Yerawada to Katraj tunnel ready, but no funds | येरवडा ते कात्रज बोगद्याचा प्रकल्प आराखडा तयार, पण निधी नाही

येरवडा ते कात्रज बोगद्याचा प्रकल्प आराखडा तयार, पण निधी नाही

पुणे : येरवडा ते कात्रज या सुमारे २० किमी लांबीचा बोगदा प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद केले आहे, मात्र या प्रकल्पासाठी कसल्याही प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.

‘पीएमआरडीए’च्या ४ हजार ५०३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता दिली गेली. त्यावेळी पीएमआरडीएने कात्रज ते येरवडा असा बोगदा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. तसेच, या प्रकल्पाचा आराखडा तयार करावा आणि हा ‘ट्विन टनेल’ असावा, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना दिल्या होत्या. उत्तर ते दक्षिण मार्ग जोडण्यासाठी हा बोगदा होणार होता. त्यासाठी प्रतिकिलोमीटर ४०० कोटी रुपये खर्च येणार होता.

या प्रकल्प आराखडा पीएमआरडीए तयार केला. त्यानंतर पीएमआरडीएने पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोगद्याबाबत चर्चा केली. त्यात या बोगदावर एक मार्ग जाण्यासाठी एक मार्ग येण्यासाठी ठेवला होता. या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी ठिकठिकाणी या मार्गावर जाण्याचा (एंट्री) आणि बाहेर पडण्याचा (एक्झिट) मार्ग असेल. पण त्या ठिकाणी वाहतुकीसाठी एक्स्ट्रा रस्त्याची लेन करावी लागणार आहे.

Web Title : येरवदा-कात्रज सुरंग परियोजना मसौदा तैयार, लेकिन धन आवंटित नहीं

Web Summary : येरवदा-कात्रज सुरंग परियोजना का मसौदा तैयार है, लेकिन धन की कमी है। पीएमआरडीए ने योजना को मंजूरी दी, जिसमें उन्नत तकनीक के साथ एक जुड़वां सुरंग की परिकल्पना की गई है। उत्तर-दक्षिण कनेक्शन के लिए प्रति किलोमीटर महत्वपूर्ण निवेश की आवश्यकता है, प्रवेश/निकास बिंदुओं के लिए अतिरिक्त सड़क लेन की आवश्यकता है।

Web Title : Yerwada-Katraj Tunnel Project Draft Ready, but No Funds Allocated

Web Summary : The Yerwada-Katraj tunnel project draft is prepared, but faces funding challenges. PMRDA approved the plan, envisioning a twin-tunnel with advanced technology. The north-south connection requires significant investment per kilometer, with entry/exit points needing extra road lanes.