Video : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ ? नळ स्टॉप परिसरातील हॉटेलमध्ये पोह्यात झुरळ सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 20:33 IST2026-01-27T20:32:12+5:302026-01-27T20:33:08+5:30
घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्येही तीव्र नाराजी दिसून येत आहे.

Video : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ ? नळ स्टॉप परिसरातील हॉटेलमध्ये पोह्यात झुरळ सापडले
पुणे : शहरातील नळ स्टॉप परिसरात असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये नाश्त्यादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ग्राहकाने पोहे ऑर्डर केल्यानंतर, त्याच्या प्लेटमध्ये थेट मेलेले झुरळ आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच ग्राहकाने संताप व्यक्त केला असून, हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्येही तीव्र नाराजी दिसून येत आहे. “प्रसिद्ध हॉटेलमध्ये जर अशी अवस्था असेल, तर इतर ठिकाणांची काय परिस्थिती असेल?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने तपास करून संबंधित हॉटेलवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, शहरात सातत्याने वाढत असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेविषयीच्या तक्रारी पाहता, प्रशासनाकडून नियमित तपासणी आणि कठोर नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.