महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 15:48 IST2025-06-08T15:48:05+5:302025-06-08T15:48:48+5:30

पुणे : काेथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराच्या उच्छादामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’ करण्यावर ...

pune news Pest control in all Municipal Corporation theaters | महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’

महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’

पुणे : काेथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराच्या उच्छादामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’ करण्यावर भर दिला आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाटकाचा प्रयाेग सुरू असताना एका महिलेच्या साडीमध्ये उंदीर शिरला. यात उंदराचे नख लागल्याने या महिलेला इंजेक्शन घ्यावे लागले. या घटनेची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली हाेती.

तसेच बहुतेक राजकीय पक्ष्यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. यानंतर महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाने तत्काळ काही पावले उचलली. नाट्यगृहातील उंदरांचा बंदाेबस्त करण्यासाठी पेस्ट कंट्राेल, स्वच्छता माेहीम राबविली गेली. परंतु हा प्रश्न केवळ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा नसल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले.

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या सर्वच नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू असून, बहुतेक ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. तसेच स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आल्याचे माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.

Web Title: pune news Pest control in all Municipal Corporation theaters