प्रवाशांची गैरसोय;‘आझाद हिंद एक्स्प्रेस’ला सहा तास उशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:32 IST2025-11-07T10:31:40+5:302025-11-07T10:32:35+5:30
गेल्या काही दिवसांपासून या गाडीला वारंवार उशीर होत आहे. पुणे विभागातून कोलकाता येथे जाण्यासाठी ही गाडी महत्त्वाची आहे. यामुळे या गाडीला कायमस्वरूपी प्रवाशांची गर्दी असते.

प्रवाशांची गैरसोय;‘आझाद हिंद एक्स्प्रेस’ला सहा तास उशीर
पुणे : पुणेरेल्वे विभागातून धावणारी पुणे ते हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस या गाडीला गुरुवारी पुणे स्थानकावरून निघण्यासाठी सहा तास उशीर झाला. ही गाडी पुण्यातून दररोज ६ वाजून ३५ मिनिटांनी निघते. परंतु गुरुवारी या गाडीचे रिशेड्यूल रात्री १२ वाजून १० मिनिटांनी करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना सहा तास पुणे स्थानकावर ताटकळत बसावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून या गाडीला वारंवार उशीर होत आहे. पुणे विभागातून कोलकाता येथे जाण्यासाठी ही गाडी महत्त्वाची आहे. यामुळे या गाडीला कायमस्वरूपी प्रवाशांची गर्दी असते. परंतु सातत्याने होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांना गैरसोयीचा फटका बसत आहे.
हावडावरून येताना काही विभागात रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. य्यामुळे गाडीला उशीर होत आहे. संध्याकाळी पुण्यातून वेळेवर सोडण्यासाठी रेक उपलब्ध नसल्यामुळे पुण्यातून वेळेत गाडी सोडण्याची अडचण होते. परिणामी या गाडीला उशीर होत आहे.