शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Mundhwa land deal case : मुंढवा गैरव्यवहार प्रकरणातील मुद्रांक बुडविल्याप्रकरणी आता ३ मार्चला सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:14 IST

अमेडिया कंपनीला आता थकीत मुद्रांक शुल्क २१ कोटी आणि २ कोटी १० लाखांचा दंड असे २३ कोटी १० लाख रुपये भरावे लागणार आहेत.

पुणे :मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहारप्रकरणी केलेल्या दस्तनोंदणीत मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाने पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला २१ कोटी आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत संपली. त्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आता विभागाने १५ दिवसांची मुदत वाढवून दिली असून, पुढील सुनावणी ३ मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, अमेडिया कंपनीला आता थकीत मुद्रांक शुल्क २१ कोटी आणि २ कोटी १० लाखांचा दंड असे २३ कोटी १० लाख रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतरही रक्कम न भरल्यास सक्तीने वसुली करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुंढवा येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या जमीन गैरव्यवहारात मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर सहजिल्हा निबंध कार्यालयाकडून सात टक्के मुद्रांक शुल्क अर्थात २१ कोटी रुपये तसेच २० मे या दस्त नोंदणीच्या तारखेपासून आजवर असा १ टक्केप्रमाणे १ कोटी ४७ लाख दंड असे एकूण २२ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम पुढील दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत १२ फेब्रुवारीला संपली.

त्यानंतर कंपनीकडून नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे या प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली होती. ही सुनावणी सोमवारी (दि. १६) झाली. त्यात कंपनीच्या वकिलांनी बाजू मांडली. त्यात या प्रकरणी कागदपत्रांच्या पूर्तेतसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, बिनवडे यांनी केवळ १५ दिवसांची मुदतवाढ दिली. त्यानुसार आता ३ मार्च रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mundhwa land deal case: Hearing on March 3rd for stamp duty evasion.

Web Summary : Amedia Company gets 15 more days to pay ₹23.1 crore in Mundhwa land deal stamp duty evasion case. Failure to pay will result in forced recovery, officials said. Next hearing on March 3rd.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMundhvaमुंढवा