MPSC Exam : राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा तयारीला फक्त महिनाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 13:55 IST2026-03-01T13:53:40+5:302026-03-01T13:55:09+5:30

अखेर शुक्रवारी याचा निकाल जाहीर झाला आणि विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

pune news mpsc exam State Service Preliminary Exam Result Announced; Only One Month to Prepare for Main Exam | MPSC Exam : राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा तयारीला फक्त महिनाच

MPSC Exam : राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा तयारीला फक्त महिनाच

पुणे : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५’ परीक्षेचा निकाल अनेक दिवसांपासून प्रलंबित हाेता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात हाेती. अखेर शुक्रवारी याचा निकाल जाहीर झाला आणि विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला. या पूर्वपरीक्षेत राज्यभरातून २७५४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यापैकी सर्वाधिक १११३ विद्यार्थी पुणे केंद्रावरील आहेत. त्या खालाेखाल अहिल्यानगर १५५, काेल्हापूर १४८, छत्रपती संभाजीनगर १३४, सातारा १२४, नाशिक जिल्ह्यातील ११८ विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरले आहेत.

याशिवाय अकाेला २४, अलिबाग ६, अमरावती ४४, बीड ३१, भंडारा १४, बुलढाणा १७, चंद्रपूर १४, धाराशिव ३९, धुळे २१, गडचिराेली १२, गाेंदिया ११, हिंगाेली ८, जळगाव ३५, जालना १४, कुडाळ ७, लातूर ६०, मुंबई (मध्य) ५८, मंबई (पश्चिम) २८, नागपूर ७१, नांदेड ७६, नंदुरबार ११, नवी मुंबई ६२, परभणी ३०, रत्नागिरी ५, सांगली ८८, साेलापूर ६६, ठाणे ५४, वर्धा ९, वाशिम २० आणि यवतमाळ येथील २१ विद्यार्थी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वेळखाऊ कारभाराबद्दल विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी हाेती. अनेक विद्यार्थी त्याबाबत उघड बाेलत हाेते. अनेकदा आंदाेलन करून त्याकडे लक्ष वेधले हाेते. आयोगाने ९ नोव्हेंबर २०२५ राेजी घेतलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल खूप उशिराने लागल्यामुळे मुख्य परीक्षेची सखोल तयारी करणार कशी, असा प्रश्न पडला हाेता. अखेर आयोगाने निकाल प्रसिद्ध केला आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. आता विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे.

आता लक्ष्य मुख्य परीक्षा!

राज्य लाेकसेवा आयोगाने निकाल जाहीर करण्यास विलंब लावल्याने विद्यार्थ्यांना कमी वेळेत मुख्य परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी केवळ ३० दिवस मिळणार आहेत. इतक्या कमी वेळेत तयारी करून यशाला गवसणी घालण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे आहे. 

Web Title : राज्य सेवा प्रारंभिक परीक्षा परिणाम घोषित; मुख्य परीक्षा के लिए केवल एक महीना

Web Summary : राज्य सेवा प्रारंभिक परीक्षा का बहुप्रतीक्षित परिणाम घोषित, 2754 छात्र उत्तीर्ण। पुणे 1113 सफल उम्मीदवारों के साथ आगे। छात्रों ने राहत व्यक्त की, लेकिन MPSC की देरी के कारण मुख्य परीक्षा की तैयारी के लिए 30 दिनों की तंग समय-सीमा का सामना करना पड़ रहा है।

Web Title : State Service Prelims Result Declared; Only a Month for Mains Prep

Web Summary : The long-awaited State Service Prelims result is out, with 2754 students qualifying. Pune leads with 1113 successful candidates. Students express relief but face a tight 30-day window for Mains exam preparation due to MPSC delays.