हप्ता द्यावा लागेल;दाबेली विक्रेत्याला धमकावून हप्ता मागणाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:30 IST2025-08-05T15:28:30+5:302025-08-05T15:30:19+5:30
दोन दिवसांपूर्वी दाबेली विक्रेता गाडी बंद करुन रात्री दहाच्या सुमारास घरी निघाला होता. त्या वेळी आरोपी तेथे आला. त्याने दाबेली विक्रेत्याला अडवले. या भागात व्यवसाय करायचा असेल.

हप्ता द्यावा लागेल;दाबेली विक्रेत्याला धमकावून हप्ता मागणाऱ्यावर गुन्हा
पुणे : दाबेली विक्रेत्याला व्यवसाय करण्यासाठी दरमहा १०० ते २०० रुपये हप्ता मागितल्याप्रकरणी लष्कर पोलिसांकडून सराईताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सराईताने लष्कर भागातील एका महाविद्यालयाच्या परिसरातील वाहनतळ चालकाकडे दरमहा पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत दाबेली विक्रेत्याने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील एका महाविद्यालयासमोर तक्रारदार दाबेली विक्रीची गाडी लावतो.
दोन दिवसांपूर्वी दाबेली विक्रेता गाडी बंद करुन रात्री दहाच्या सुमारास घरी निघाला होता. त्या वेळी आरोपी तेथे आला. त्याने दाबेली विक्रेत्याला अडवले. या भागात व्यवसाय करायचा असेल.
तर, दरमहा १०० ते २०० रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी त्याला देण्यात आली. खंडणी मागितल्याप्रकरणी सराईताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या सराईताचा शोध घेण्यात येत आहे.