शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात धक्कादायक प्रकार ..! धायरी केंद्रावर शिक्षकानेच दिली कॉपी, सीसीटीव्हीत उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 09:44 IST

- शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून असे प्रकार सुरू असल्याचे बाेलले जात आहे.

पुणे : राज्यात दहावी-बारावीची परीक्षा काॅपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतरही अनेक प्रकार समाेर येत आहेत. विशेषत: सीसीटीव्ही यंत्रणेमुळे काॅपीचे प्रकार पुढे आले आहेत. पुण्यातही असे प्रकार घडत असून, धायरी परिसरातील एका केंद्रावर चक्क शिक्षकांनीच काॅपी पुरविल्याचे उघड झाले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून असे प्रकार सुरू असल्याचे बाेलले जात आहे.

बुधवारची ही घटना. सकाळच्या सत्रात रसायनशास्त्राचा पेपर हाेता. येथे नियुक्त शिक्षकाला चिरीमिरी देऊन चहापानासाठी बाहेर पाठवले आणि तेथील शिक्षकाने वर्गाचा ताबा घेत विद्यार्थ्यांना लाँगबुक वाटून कॉपी करण्यास प्रवृत्त केले असल्याचे विद्यार्थ्यानेच पालकाला सांगितले. हे सर्व घडत असताना अचानक परीक्षा नियंत्रक वर्गात दाखल झाले आणि सर्वांचीच तारांबळ उडाली, असेही परीक्षार्थीने सांगितले.

अधिक माहितीनुसार, एका विद्यार्थिनीची काॅपी पकडली गेल्यानंतर तिने थेट संबंधित शिक्षकाकडेच बोट दाखवले. यानंतर परीक्षा नियंत्रकांनी विद्यार्थिनी आणि शिक्षक दोघांवरही कारवाईचा बडगा उगारला अन् विद्यार्थिनीचे गुण कापले, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यावरून महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून शिक्षकच असा प्रकार करत असल्याची बाब या घटनेवरून पुढे आली आहे. या प्रकारामुळे काॅपीमुक्त अभियानाला शिक्षकच सुरुंग लावत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून केंद्रावर कडक तपासणी केली जात हाेती आणि पोलिस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता. एका वर्गात बाहेरील शिक्षकाची नियुक्तीदेखील करण्यात आली होती. पेपर सुरू होऊन सुमारे दीड तास उलटल्यानंतर संबंधित महाविद्यालयाचा एक शिक्षक वर्गात आला. त्याने नियुक्त शिक्षकाला चिरीमिरी देऊन चहासाठी जाण्यास सांगितले. ‘दहा मिनिटांत परत या’ असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार ओळींमध्ये लाँगबुकचे वाटप केले.

विद्यार्थी लाँगबुकमधून उत्तरे उतरवत असतानाच परीक्षा नियंत्रक अचानक वर्गात दाखल झाले. काही विद्यार्थ्यांनी घाईघाईने काॅपी लपवली; मात्र एका विद्यार्थिनीने पेन्सिलने उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिल्याने प्रकार उघड झाला. परीक्षा नियंत्रकांनी चौकशी केली असता विद्यार्थिनीने संबंधित शिक्षकाचे नाव घेतले. त्यानंतर दोघांवरही नियमानुसार कारवाई केल्याचे समजते. या प्रकरणामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. 

धायरी येथील परीक्षा केंद्रावर काॅपीचा प्रकार घडत असेल तर गंभीर आहे. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन अधिक चाैकशी केली जाईल आणि दाेषींवर याेग्य कारवाई करण्यात येईल.  - ए. एस. उकिरडे, अध्यक्ष, पुणे बोर्ड

English
हिंदी सारांश
Web Title : Teachers caught providing copy to students for 100% school result.

Web Summary : Pune: Teachers in Dhayari caught providing copy during exams for better results. An invigilator caught a student cheating using provided longbooks, sparking action and raising transparency concerns.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणHSC / 12th Exam12वी परीक्षा