Bopodi land scam : बोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता सुनावणी १८ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 21:35 IST2026-02-25T21:30:28+5:302026-02-25T21:35:02+5:30

- पक्षकार उपस्थित न राहिल्याने सुनावणी पुढे ढकलली 

pune news Hearing in Bopodi land scam case now on March 18 | Bopodi land scam : बोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता सुनावणी १८ मार्चला

Bopodi land scam : बोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता सुनावणी १८ मार्चला

पुणे : बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याचा आदेश रद्द करण्यासाठी लावण्यात आलेली सुनावणी आता १८ मार्च रोजी होणार आहे. ही सुनावणी बुधवारी (दि. २५) होणार होती मात्र, दोन्ही बाजुंकडील पक्षकार सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने ही सुनावणी तीन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या मालकीच्या जमिनीवर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी कुळांची नावे लावण्याचा आदेश दिला होता. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने त्याविषयीचे फेरफार अंमलात येणार नाहीत यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधितांना निर्देश दिले होते. त्यानंतर येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर येवले यांचे आदेश नियमानुसार रद्द करण्याची गरज होती. त्यानुसार पुण्याचे उपविभागीय अधिकारी सुनील जोशी यांनी सुनावणी घेण्यासाठी कृषी महाविद्यालय आणि दुसरे पक्षकार हेमंत गवंडे आणि विध्वांस कुटुंबीयांना नोटीस बजावली. मात्र, गवंडे आणि विध्वांस कुटुंबियांनी जोशी यांच्या सुनावणीवर आक्षेप घेत त्रयस्थ अधिकाऱ्याकडून सुनावणी घेण्याची मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्याकडे केली होती.

त्यानंतर राऊत यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संमतीने ही सुनावणी कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांच्या कार्यलयात होणार आहे. याबाबत डुडी यांनी टिळेकर यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आता ही सुनावणी बुधवारी (दि. २५) ठेवण्यात आली होती. मात्र, गवंडे तसेच कृषी महाविद्यालय हे दोन्ही पक्षकार सुनावणीस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे टिळेकर यांनी ही सुनावणी पुढील तीन आठवड्यांसाठी पुढे ढकलली. आता ही सुनावणी १८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.

Web Title : बोपोडी भूमि घोटाले की सुनवाई अब 18 मार्च को निर्धारित

Web Summary : बोपोडी भूमि घोटाले, जिसमें निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले शामिल हैं, की सुनवाई दोनों पक्षों की अनुपस्थिति के कारण 18 मार्च तक स्थगित कर दी गई है। किरायेदारों के नाम शामिल करने के आदेश को चुनौती दी गई, जिसके कारण येवले का निलंबन और बाद में जांच हुई।

Web Title : Bopodi Land Scam Hearing Now Scheduled for March 18th

Web Summary : The hearing regarding the Bopodi land scam, involving suspended Tehsildar Suryakant Yevale, has been postponed to March 18th due to the absence of both parties. The order to include tenants' names was challenged, leading to Yevale's suspension and a subsequent inquiry.