सर्वच पानटपऱ्यांवर विकला जातोय गुटखा अन् मावा; शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:01 IST2025-07-30T11:00:50+5:302025-07-30T11:01:03+5:30

- प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थी व्यसनाधीन

pune news gutkha and Mawa are being sold at all the shops; shops in the vicinity of schools and colleges | सर्वच पानटपऱ्यांवर विकला जातोय गुटखा अन् मावा; शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्या

सर्वच पानटपऱ्यांवर विकला जातोय गुटखा अन् मावा; शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्या

पुणे : शाळा-महाविद्यालयांच्या दोनशे मीटर परिसरात पान, तंबाखू विकणाऱ्या टपऱ्या, जुगार अड्डे, दारूची दुकाने किंवा बार असून नये, असा नियम असताना शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांच्या गेटला लागूनच पान, तंबाखू विकणाऱ्या टपऱ्या आहेत. या टपऱ्यांमध्ये छुप्या पद्धतीने बंदी असलेला गुटखा व मावा विकला जातो. असे असताना प्रशासन मात्र सोयिस्करपणे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. पोलिस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी मात्र कमी वयातच व्यसनाधीन होत असल्याचे पाहायला मिळते.

राज्य सरकारने राज्यामध्ये गुटखा विक्रीस व बाळगण्यास बंदी घातली आहे. असे असताना जवळपास सर्वच पान, तंबाखू विकणाऱ्या टपऱ्यांमध्ये सर्व कंपन्यांचा गुटखा व मावा छुप्या पद्धतीने विकला जातो. काही ठिकाणी याला कोडवर्ड ठेवण्यात आलेला आहे. सुगंधी तंबाखूच्या नावावर दोन पुड्या एकत्र करून गुटखा तयार केला जातो. गुटखा, मावा व सिगारेट असे धूम्रपानाचे पदार्थ १८ वर्षांच्या खालील मुलांना विक्री करणे कायद्याने गुन्हा असताना पान, तंबाखू टपरीमध्ये हे पदार्थ मुलाचे वय न पाहता खुलेआम विकले जातात. शिवाय शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या दोनशे मीटर परिसरात पान, तंबाखू विकणाऱ्या टपऱ्या असू नये, असा नियम असताना अनेक शाळा-महाविद्यालयांच्या गेटला लागूनच पान, तंबाखू विकणाऱ्या टपऱ्या आहेत. या टपऱ्यांमध्ये छुप्या पद्धतीने बंदी असलेला गुटखा व मावा विकला जातो. याकडे प्रशासन मात्र सोयिस्करपणे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे कमी वयात मुले व्यसनाधीन होत आहेत.

पोलिसांकडून शहरात कायमच बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्यांवर व तो बाळगणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यापूर्वी कारवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा व नशेचे पदार्थ जप्त केले आहेत. यापुढेही ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने आणखी तीव्र केली जाईल.
- पंकज देशमुख, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे.

Web Title: pune news gutkha and Mawa are being sold at all the shops; shops in the vicinity of schools and colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.