शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर अपघात; ट्रेलरवर कार आदळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू,दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:58 IST

कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ट्रकला धडकली.  

पिंपरी : आयशर ट्रेलरवर कार आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. गुरुवारी (दि. १८) सकाळी पावणेसहाच्या सुमारास देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावर ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

दिव्यराजसिंग राठोड (वय २२, रा. राजस्थान), सिद्धांत आनंद (२३, रा. झारखंड) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हर्ष मिश्रा (२१, रा. राजस्थान), निहार तांबोळी (वय २०, रा. ताथवडे) हे दोघे जखमी झाले आहेत. ट्रेलर चालक मनीष कुमार सूरज मणिपाल (वय ३९, रा. वडाळा, मुंबई) याला ताब्यात घेतले आहे. देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये बीबीए अभ्यासक्रम शिकत असलेले चार विद्यार्थी बुधवारी लोणावळ्याला फिरायला गेले होते.

परत येताना गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास देहुरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावरून जात होते. त्यावेळी संशयित मनीष कुमार याने त्याच्या ताब्यातील आयशर ट्रेलर रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांमुळे अचानक थांबवला. त्यावेळी पाठीमागून आलेली कार आयशर ट्रेलरवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. 

 

या अपघातात कारमधील सिद्धांत आणि दिव्यराज या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले हर्ष व निहार हे दोनजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सिद्धांत आणि दिव्यराज यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात