शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

धानेप गावात ज्येष्ठ महिलेवर प्राणघातक हल्ला; आरोपीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:13 IST

हल्ल्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

पानशेत - राजगड तालुक्यातील धानेप गावात एका ज्येष्ठ महिलेवर अमानुष हल्ला झाल्याची घटना घडली आहे. राधाबाई कोंडीबा डोईफोडे (वय ७०) यांच्यावर गावातीलच शंकर अनंता मरळ याने काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर २२ मार्च रोजी उशिरा राजगड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.  फिर्यादीत राधाबाई डोईफोडे यांनी म्हटले आहे की, शंकर मरळ हा दारू पिऊन आमच्या घरासमोर आला आणि शिवीगाळ करू लागला. त्यानंतर त्याने दारात पडलेल्या लाकडाने माझ्या तोंडावर, हातावर आणि पायावर जबर मारहाण केली. माझे पती मला वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही त्याने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३२४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.   या घटनेनंतर गावात संतापाची भावना निर्माण झाली आहे. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.  ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मारहाणीनंतरही पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही. गावातील पोलीस पाटीलही घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे आमच्या कुटुंबाला भीती वाटत आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी प्रतिक्रिया पीडित महिलेच्या भाच्याने, विकास खुटेकर यांनी दिली.  पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन खामगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याArrestअटक